"दु:खी लोकांवर कॅमेरे फिरवताय", मलायकाच्या घरी गेलेल्या पापाराझींना वरूण धवनने घेतलं फैलावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:31 PM2024-09-12T12:31:57+5:302024-09-12T12:34:02+5:30

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोरा मुंबईत पोहचताच तिचा व्हिडीओ शूट करणाऱ्या पापाराझींची वरूण धवनने चांगलीच खरडपट्टी काढली आहे. 

bollywood actor varun dhawan share angry post on social media to insensitive behaviour of paparazzi in malaika arora father death | "दु:खी लोकांवर कॅमेरे फिरवताय", मलायकाच्या घरी गेलेल्या पापाराझींना वरूण धवनने घेतलं फैलावर

"दु:खी लोकांवर कॅमेरे फिरवताय", मलायकाच्या घरी गेलेल्या पापाराझींना वरूण धवनने घेतलं फैलावर

Malaika Arora Father Death : चित्रपट अभिनेत्री मलाइका अरोरा यांचे सावत्र वडील मेहता (६२) अनिल अरोरा यांचा बुधवारी सकाळी वांद्रे येथील आयेशा मॅनर सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असला, तरी ते चक्कर आल्याने तोल जाऊन पडले का, या अनुषंगानेही तपास सुरू आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मलायकाने मुंबईकडे धाव घेतली. याच दरम्यान, अभिनेत्रीला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. त्यांच्या या असंवेदनशील कृत्यावर बॉलिवूड अभिनेता वरूण धवन भडकला आहे.

ज्या क्षणी मलायकाने तिच्या वडिलांच्या बांद्रा येथील राहत्या घरी पोहचली तेव्हा गाडीतून बाहेर पडल्यानंतर ते घरात एन्ट्री करेपर्यंत माध्यमांनी तिला घेरलं. शिवाय अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कॅमेरा फिरवून तिचा व्हिडीओ बनवला. याबाबत वरूण धवनने नाराजी व्यक्त केली आहे सोबतच पापाराझींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

नुकतीच सोशल मीडियावर अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने पापाराझींचा खरपूस समाचार घेतल्याचं पाहायला मिळतंय. 

काय म्हणाला वरूण धवन?

वरूण त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये वरूणने लिहलंय, "दु:खी लोकांच्या चेहऱ्यावर कॅमेरे फिरवणे ही अत्यंत असंवेदनशील गोष्ट आहे. जरा या गोष्टीचा विचार करा, आपण काय करत आहोत? आणि यामुळे समोरच्या माणसाला काय वाटत असेल? मी समजू शकतो की हा तुमच्या कामाचा भाग आहे पण, याचा दुसऱ्याला किती त्रास होतो हे पाहा. माणूसकी दाखवा." यासोबतच वरूणने हात जोडलेला इमोजी अ‍ॅड करून पोस्ट शेअर केली आहे. 

वरुण धवन आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' मध्ये अभिनय करण्यापूर्वी त्याने शाहरुख खानचा 'माय नेम इज खान' या चित्रपटासाठी करण जोहरासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, वरुण शेवटचा 'बवाल' या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर बऱ्याचा काळानंतर वरुण आता 'स्त्री २' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. वरुण धवनच्या नवीन चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: bollywood actor varun dhawan share angry post on social media to insensitive behaviour of paparazzi in malaika arora father death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.