'स्वत:ला पेटवून घेत १० व्या मजल्यावरुन उडी मारली,' विकी कौशलने सांगितला वडिलांचा 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 04:24 PM2023-07-26T16:24:27+5:302023-07-26T16:24:53+5:30

Vicky kaushal: विकीच्या वडिलांनी स्वत:ला आग लावत चक्क १०व्या मजल्यावरुन उडी मारली होती. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषय़ी भाष्य केलं.

bollywood-actor-vicky-kaushal-talk-about-father-struggling-days | 'स्वत:ला पेटवून घेत १० व्या मजल्यावरुन उडी मारली,' विकी कौशलने सांगितला वडिलांचा 'तो' प्रसंग

'स्वत:ला पेटवून घेत १० व्या मजल्यावरुन उडी मारली,' विकी कौशलने सांगितला वडिलांचा 'तो' प्रसंग

googlenewsNext

अल्पावधीत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे विकी कौशल. उत्तम अभिनयाच्या जोरावर विकीने बॉलिवूडमध्ये त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं.  कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर विकी त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आला. परंतु, यावेळी तो त्याच्या वडिलांमुळे चर्चेत येत आहे. एकदा त्याच्या वडिलांनी स्वत:ला आग लावत चक्क १०व्या मजल्यावरुन उडी मारली होती. एका मुलाखतीमध्ये विकीने वडिलांनी केलेल्या संघर्षाविषयी भाष्य केलं. यावेळी बोलत असताना तो भावूक झाला.

विकी आणि त्याचा भाऊ सनी कौशल दोघंही कलाविश्वात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडीलदेखील बॉलिवूडमध्ये एकेकाळी चांगलेच सक्रीय होते. विकीचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमध्ये अॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम करत होते. जवळपास १० वर्ष त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलं. यावेळी बऱ्याचदा जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केलं. त्यांचा असाच एक प्रसंग त्यांने सांगितला आहे.

"अॅक्शन दिग्दर्शक म्हणून माझ्या वडिलांची ओळख आहे. पण, ते आधी एक स्टंटमॅन होते. इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जवळपास १० वर्ष काम केलं. मात्र, स्टंट करताना त्यांना कधीच सुरक्षा दिली जात नव्हती. तरी सुद्धा ते स्टंट करायचे", असं विकी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "एकदा माझ्या वडिलांनी एका स्टंटसाठी स्वत:ला पेटवून दिलं होतं आणि १० व्या मजल्यावरुन उडी मारली होती.  त्यांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. पण, जर त्यावेळी त्यांनी कष्ट केले नसते तर आमचा सांभाळ कसा केला असता. स्टंट करताना ते जखमीदेखील झाले होते.पण, त्यावेळी आमच्याकडे उपचारांसाठीही पैसे नसायचे."

दरम्यान, विकीचे वडील फारसे प्रकाशझोतात नसतात. मात्र, कधीही ते प्रसारमाध्यमांच्या समोर आले की सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने वागतात. त्यामुळे ते पापाराझींमध्येही तितकेच लोकप्रिय आहेत.
 

Web Title: bollywood-actor-vicky-kaushal-talk-about-father-struggling-days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.