खलनायक हूँ मैं...! 'DON-3' मध्ये 'हा' अभिनेता साकारणार व्हिलन; रणवीर सिंगला देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:21 IST2025-01-29T09:18:55+5:302025-01-29T09:21:25+5:30
साधारणत: २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा 'डॉन' हा चित्रपट सुद्धा चांगलाच गाजला.

खलनायक हूँ मैं...! 'DON-3' मध्ये 'हा' अभिनेता साकारणार व्हिलन; रणवीर सिंगला देणार टक्कर
Don-3 Update:रणवीर सिंग (Ranveer Singh)आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'डॉन-३' चित्रपटाची मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. साधारणत: २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा 'डॉन' हा चित्रपट सुद्धा चांगलाच गाजला. या चित्रपटाचा सीक्वलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर 'डॉन'चा तिसरा भाग कधी येणार? याची गेली बरीच वर्षं प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. अलिकडेच फरहान अख्तरने 'डॉन ३'ची घोषणा केली आणि त्यानंतर सगळेच फार उत्सुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवी अपडेट समोर येत आहे. 'डॉन-३' मध्ये लीड कॅरेक्टर फायनल झाल्यानंतर खलनायक कोण साकारणार? याबद्दल जाणून घेण्यास सिनेरसिक देखीस उत्सुक होते. परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
मीडिया रिपोर्टमनुसार, 'डॉन-३' मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता विक्रांत मेस्सीला (Vikrant Massey) अॅप्रोच करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेत्याची खलनायकाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे 'डॉन-३' मध्ये रणवीर सिंग आणि विक्रांत मेस्सीमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. परंतु अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांकडून किंवा विक्रांत मेस्सीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
विक्रांत मेस्सीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अलिकडेच अभिनेता विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटामुळे चर्चेत आला होता. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. तसेच या चित्रपटामध्ये विक्रांत मेस्सीसह राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा हे देखील पाहायला मिळाले. याशिवाय अभिनेत्याने 'सेक्टर ३६', '१२ वीं फेल', 'गैस लाइट', 'फॉरेंसिक' तसेच 'हसीना दिलरुबा' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.