दीपिका, सारा नाही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत विक्रांत मेस्सीला करायचंय काम; अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 12:48 IST2024-11-08T12:42:52+5:302024-11-08T12:48:17+5:30
अभिनेता विक्रांत मेस्सी त्याचा आगामी चित्रपट 'द साबरती रिपोर्ट' मुळे चर्चेत आला आहे.

दीपिका, सारा नाही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत विक्रांत मेस्सीला करायचंय काम; अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा
Vikrant Massey: '12 वी फेल फेम अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) त्याचा आगामी चित्रपट 'द साबरती रिपोर्ट' मुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. सध्या अभिनेता चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याचा पाहायला मिळतोय. त्याकरिता विक्रांत वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय.
नुकतीच अभिनेत्याने 'Filmygyan' सोबत बातचीत केली. त्यादरम्यान विक्रांतला एक प्रश्न विचारण्यात आला. दीपिका की सारा अली खान कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "मला भविष्यात अनुष्का शर्मासोबत काम करायचं आहे. 'दिल धडकनें दो' चित्रपटात मी फ्रीमध्ये काम केलं होतं. पण, यापुढे माझी कोस्टार म्हणून मला तिच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल". या मुलाखतीत अभिनेत्री राशी खन्ना देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय.
वर्कफ्रंट
विधू विनोद चोप्राच्या '12 वी फेल' चित्रपटाने केवळ प्रेक्षकांनाच आकर्षित केले नाही तर हा चित्रपट विक्रांत मेस्सीच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे. आता अभिनेता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये स्थानिक पत्रकाराच्या भूमिकेत आहे. २००२ साली झालेल्या गोध्रा ट्रेन अग्रीकांड प्रकरणानंतरच्या सत्य घटनेवर सिनेमा आधारित आहे. एकता कपूरने सिनेमाची निर्मिती केली असून धीरज सरना यांनी दिग्दर्शित केला आहे.