कंगनाला बॉलीवूड कलाकारांचे चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:38 AM2020-09-05T04:38:14+5:302020-09-05T04:38:38+5:30

मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर असून, इथे आलेल्या प्रत्येकाला हे शहर संधी देते, घडविते असे या कलाकारांनी म्हटले आहे.

Bollywood actors' perfect answer to Kangana ranaut | कंगनाला बॉलीवूड कलाकारांचे चोख उत्तर

कंगनाला बॉलीवूड कलाकारांचे चोख उत्तर

googlenewsNext

मुंबई : मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वक्तव्याबद्दल रितेश देशमुख, सोनू सूद, स्वरा भास्कर, दिया मिर्झा आदी कलाकारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर असून, इथे आलेल्या प्रत्येकाला हे शहर संधी देते, घडविते असे या कलाकारांनी म्हटले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाबाबत कंगनाने म्हटले होते की, मला मुंबई पोलिसांची भीती वाटते. त्या वक्तव्यावर टीका करताना शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले होते की, इतकी भीती वाटत असेल तर कंगनाने मुंबईला येऊ नये.
संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिली आहे, असा आरोप अभिनेत्री कंगना रनौत हिने एका टिष्ट्वटद्वारे केला. तिने म्हटले आहे की, ज्या मुंबईचे रस्ते एकेकाळी स्वातंत्र्य चळवळीतील घोषणांनी निनादले होते, त्याच शहरात आता जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आता मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटू लागली आहे.
कंगनाच्या वक्तव्याबाबत अभिनेता रितेश देशमुख यांनी म्हटले आहे की, मुंबई हा हिंदुस्थान आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने सांगितले की, दुसºया राज्यातून येऊन मुंबईत मी गेली दहा वर्षे राहात आहे. मुंबई सर्वात सुरक्षित शहर आहे.
मुंबई पोलिसांमुळे आम्ही सुरक्षित आहोत. अभिनेत्री दिया मिर्झाने सांगितले की, मुंबई माझ्या जीवाभावाची आहे. या शहरात गेल्या वीस वर्षांपासून मी राहात आहे. या शहराने मला मनापासून स्वीकारले व सुरक्षित ठेवले.

मुंबई शहर सर्वांचे नशीब बदलते : सोनू सूद
लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रवासाची सोय करणाºया अभिनेता सोनू सूदने कंगना रनौतच्या वक्तव्याचा थेट उल्लेख न करता म्हटले आहे की, मुंबई शहर सर्वांचे नशीब बदलते. जर तुम्ही सलाम केलात तरच तुम्हाला सलामी मिळते.

 

Web Title: Bollywood actors' perfect answer to Kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.