मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा, जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप; तक्रार दाखल
By अमित इंगोले | Published: October 17, 2020 11:10 AM2020-10-17T11:10:14+5:302020-10-17T12:22:12+5:30
ही तक्रार एका महिला कलाकाराच्या आरोपाच्या आधारावर दाखल करण्यात आली आहे. या महिलेने सांगितलं की, आरोपीने वर्ष २०१५ ते २०१८ पर्यंत लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत बलात्कार केला होता.
मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय विरोधात बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्ती गर्भपाताचा आरोप लावत तक्रार दाखल केली आहे. ही केस एका महिला कलाकाराच्या आरोपाच्या आधारावर दाखल करण्यात आली आहे. या महिलेने सांगितलं की, आरोपीने वर्ष २०१५ ते २०१८ पर्यंत लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत बलात्कार केला होता.
असं सांगितलं जात आहे की, तक्रार करणारी महिला हिंदी आणि भोजपुरी सिनेमात काम करत होती. या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१५ सालात ती आरोपी अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर मे २०१५ मध्ये आरोपीने त्याच्या फ्लॅटवर तिला काहीतरी नशेचं ड्रिंक दिल्यावर तिच्यावर बलात्कार केला. आपल्या तक्रारीत ती म्हणाली की, लग्नाचं आमिष दाखवून आरोपी अभिनेत्याने अनेक वर्ष तिच्यासोबत बलात्कार करत राहिला. (बलात्कारी युवकाला महिलेनं चाकूनं भोसकलं, फोन करुन पोलिसांनाही सांगितलं)
पीडितेने पुढं सांगितलं की, रिलेशनशिपदरम्यान ती गर्भवती झाली होती. ज्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात करण्यात आला. पीडितेने जेव्हा आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकला तर त्याने कथितपणे लग्नपत्रीका जुळत नसल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर लग्नाचा विषय काढल्याने आरोपीच्या आईने पीडितेला धमकी दिली होती. ओशिवरा पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे. (बांधकाम मजुराच्या ७ वर्षीय चिमुकलीचे अपहरणकरून अतिप्रसंगाचा प्रयत्न; दोघे आरोपी फरार)
दरम्यान, पीडितेने २०१८ मध्येही अभिनेत्यावर आरोप लावले होते. त्यानंतर पीडितेने दिल्लीच्या एका न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली होती. कोर्टाने दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले होते. पण नंतर असं ठरलं की, जिथे ही घटना घडली आहे तेथील पोलिसच या प्रकरणाचा तपास करेल.