मुंबईच्या राजाच्या गाभाऱ्यात बॉलिवूड अभिनेत्रीचा शंखनाद, शंख वाजवला अन्...; व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 10:01 AM2024-09-08T10:01:55+5:302024-09-08T10:02:46+5:30

Ganpati Festival 2024 : मुंबईच्या राजाचं अभिनेत्रीने दर्शन घेतलं. मुंबईच्या राजाच्या दरबारातील अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री मुंबईच्या राजाचा दरबारात शंखनाद करताना दिसत आहे.

bollywood actress adah sharma seeks blessing of mumbaicha raja ganeshgalli ganpati blowing conch shankh video | मुंबईच्या राजाच्या गाभाऱ्यात बॉलिवूड अभिनेत्रीचा शंखनाद, शंख वाजवला अन्...; व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

मुंबईच्या राजाच्या गाभाऱ्यात बॉलिवूड अभिनेत्रीचा शंखनाद, शंख वाजवला अन्...; व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने मुंबईतील लालबाग नगरीही गणरायाच्या जयघोषात दुमदुमली आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या मंडळांना भेटी देतात. मुंबईचा राजा आणि लालबागच्या राजा चरणी बॉलिवूड सेलिब्रिटीही नतमस्तक होतात. एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने मुंबईतील गणेशगल्ली मंडळाच्या राजाला भेट दिली. 

मुंबईच्या राजाचं अभिनेत्रीने दर्शन घेतलं. मुंबईच्या राजाच्या दरबारातील अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री मुंबईच्या राजाचा दरबारात शंखनाद करताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मा आहे. अदा शर्माने पहिल्याच दिवशी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं. पारंपरिक पोशाखात अदा गणरायाच्या दर्शनासाठी गेली होती. गणरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर अदाने मुंबईच्या राजाच्या दरबारात शंख वाजवत शंखनाद केला. 


अदाचा मुंबईच्या राजाच्या दरबारातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, 'द केरला स्टोरी'नंतर अदा शर्मा 'बस्तर : द नक्सल स्टोरी' सिनेमामुळे चर्चेत होती. आता ती 'द गेम ऑफ गिरगीट', 'रापचिक रिता' या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: bollywood actress adah sharma seeks blessing of mumbaicha raja ganeshgalli ganpati blowing conch shankh video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.