"खड्ड्यात पडून लोक मेलेले चालतात, पण...", रणवीर अलाहाबादियाच्या बचावात बॉलिवूड अभिनेत्रीने केली संतप्त पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:05 IST2025-02-13T13:04:45+5:302025-02-13T13:05:18+5:30
एकीकडे रणवीर अलाहाबादियावर टीका होत असताना दुसरीकडे मात्र बॉलिवूड अभिनेत्रीने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे.

"खड्ड्यात पडून लोक मेलेले चालतात, पण...", रणवीर अलाहाबादियाच्या बचावात बॉलिवूड अभिनेत्रीने केली संतप्त पोस्ट
Indias Got Latent Controversy : युट्यूबर समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट हा शो चर्चेत आला आहे. या शोमध्ये पालकांविषयी अश्लील वक्तव्य केल्यामुळे युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला ट्रोल केलं जात आहे. रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनासह अन्य काही जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे रणवीर अलाहाबादियावर टीका होत असताना दुसरीकडे मात्र बॉलिवूड अभिनेत्रीने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर हिने इन्स्टाग्राम प्रकरणावरुन रणवीरची पाठराखण करत संताप व्यक्त केला आहे. "माझं डोकं चालत नाहीये. लग्नानंतरचा बलात्कार किंवा कुठल्याही प्रकारचा बलात्कार चालतो? वायू प्रदुषणामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झालेला चालतो...खड्ड्यात पडून लोक मेलेले चालतात. लाचखोरी, जातीभेद, टॅक्स आणि उत्पन्नामध्ये भिन्नता यामुळे मध्यमवर्गीय लोक मरुन जगत आहेत. पण, आपली नैतिकता आणि तत्त्वांवर कसा काय डाग लागू देऊ शकतो", असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, शोमधील अश्लील वक्तव्यामुळे रणवीरने चाहत्यांची माफी मागितली आहे. परंतु, त्याच्या या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. अनेकांनी त्याला अनफॉलोदेखील केलं आहे. समय रैनाने या सर्व प्रकरणानंतर 'इंडियाज गॉट लेटेंट'चे सर्व एपिसोड डिलीट केले आहेत.