Alia Bhatt: ...अन् आलियाने उचलली पापाराझीची चप्पल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:52 AM2023-07-14T10:52:48+5:302023-07-14T10:54:04+5:30

आलिया भट्टच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

bollywood actress alia bhatt picks up paparazi chappal netizens appraises her | Alia Bhatt: ...अन् आलियाने उचलली पापाराझीची चप्पल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Alia Bhatt: ...अन् आलियाने उचलली पापाराझीची चप्पल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

googlenewsNext

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१२ साली 'स्टुडंन्ट ऑफ द इयर' या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'राझी', 'गंगुबाई काठियावाडी', 'ब्रह्मास्त्र' यांसारख्या चित्रपटातून आलियाने अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अनेकदा आलिया पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसते. सध्या तिच्या अशाच एका व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

'विरल भय्यानी' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आलियाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया "ये चप्पल किसका है?" असं विचारत पापाराझीची चप्पल उचलून त्याला देताना दिसत आहे. आलियाच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

 "जेलमध्ये असताना माझ्या डाळीत उंदीर सापडायचे", बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला अनुभव

एकाने कमेंट करत "आलियासाठी रिस्पेक्ट बटन" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "आलिया खूप प्रेमळ आणि नम्र आहे," अशी कमेंट केलं आहे. "आलियाचे पाय जमिनीवर आहेत," असंही नेटकऱ्याने म्हटलं आहे. काहींनी आलियाचा चित्रपट येत असल्याने तिने प्रमोशनसाठी हे सगळं केल्याचंही म्हटलं आहे. 

'आदिपुरुष' चित्रपटाबाबत हॉलिवूड दिग्दर्शकाने केलं भाष्य, म्हणाले, "धर्मावर डाग लावण्याचा..."

आलियाने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरशी २०२२मध्ये लग्न केलं. त्यांना राहा ही मुलगी आहे. आलिया रॉकी और राणी की प्रेमकहानी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २८ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. 

Web Title: bollywood actress alia bhatt picks up paparazi chappal netizens appraises her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.