बॉलिवूडची ही अभिनेत्री लेस्बियन असल्याच्या चर्चेला आलं होतं उधाण, आता आहे एका बाळाची आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 19:38 IST2020-06-10T19:37:55+5:302020-06-10T19:38:28+5:30

ही अभिनेत्री लग्नाच्या आधीच आई झाली आहे.

Bollywood actress Amy Jackson was rumored to be a lesbian | बॉलिवूडची ही अभिनेत्री लेस्बियन असल्याच्या चर्चेला आलं होतं उधाण, आता आहे एका बाळाची आई

बॉलिवूडची ही अभिनेत्री लेस्बियन असल्याच्या चर्चेला आलं होतं उधाण, आता आहे एका बाळाची आई

अभिनेत्री एमी जॅक्सन एका फोटोमुळे खूप चर्चेत आली होती. या फोटोवरून एमी लेस्बियन असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या फोटोत एमीसोबत तिची मैत्रिण होती. एमी मैत्रिणीला मागून अलिंगन देताना यात दिसतेय. पण या फोटोसोबत ‘वाईफ लाईफ’ असे कॅप्शन एमीने दिले होते. त्यामुळे लेस्बियन असल्याच्या चर्चा झाली होती.

एमीसोबतची फोटोतील मुलगी युकेची मॉडेल नीलम गिल होती. नीलमनेही एमीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, तिने दिलेले कॅप्शन पाहूनही अनेकांना धक्का बसला आहे. 'लाईफ बॉल विद वाइफी एमी जॅक्सन...'असे तिने लिहिले होते. या फोटोसोबत तिने दोन वधूंची ईमोजीही टाकली आहे.


एमी तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे. लैंगिकतेबाबत बोलायलाही ती कधीच घाबरत नाही. माझी एक बेस्ट फ्रेन्ड लेस्बियन आहे, असे तिने एकदा म्हटले होते. आता ही बेस्ट फेन्ड नीलम तर नाही ना? असा प्रश्न विचारला जात होता.


एमीने 23 सप्टेंबर, 2019 ला एका गोंडस मुलाला जन्म दिला. लग्नापूर्वी एमी आई झाली. एमी जॅक्सन गरोदर असताना तिने तिच्या प्रियकरासोबत साखरपुडा केला.

ती गरोदर असल्याची बातमी तिनेच सोशल मीडियाद्वारे दिली होती.

Web Title: Bollywood actress Amy Jackson was rumored to be a lesbian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.