३३ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई! मुलाचं नाव ठेवलंय 'ऑस्कर'; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:53 IST2025-03-25T09:53:01+5:302025-03-25T09:53:25+5:30
ही बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई असून तिने मुलाचं नाव चक्क 'ऑस्कर' ठेवल्याचा खुलासा झालाय

३३ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई! मुलाचं नाव ठेवलंय 'ऑस्कर'; फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (athiya shetty) ही नुकतीच आई झाल्याने सर्वांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. अशातच आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री नुकतीच आई झाल्याची गुड न्यूज समोर येत आहे. ही अभिनेत्री म्हणजे अॅमी जॅकसन. बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन (amy jackson) दुसऱ्यांदा आई झाली आहे. अभिनेत्रीने बाळाची झलक शेअर करुन त्याच्या नावाचाही खुलासा केलाय.
अॅमी जॅक्सनचा नवरा एड वेस्टविकने २४ मार्चला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गुड न्यूज शेअर केली. अॅमी आणि वेड या पती-पत्नीने त्यांच्या आयुष्यात मुलाचं स्वागत केलं. याशिवाय एमीचा नवरा एड वेस्टविकने पत्नी अॅमीचा आणि बाळाचा क्यूट फोटो शेअर केला. बाळाला कडेवर घेऊन अॅमीने खास पोझ दिली. विशेष गोष्ट म्हणजे या पती-पत्नीने बाळाच्या नावाचाही खुलासा केला. अॅमीने तिच्या बाळाचं नाव ठेवलंय ऑस्कर. हे विशेष नाव पाहून सर्वांनीच अभिनेत्री आणि तिच्या पतीचं कौतुक केलंय.
अॅमी जॅक्सन दुसऱ्यांदा झाली आई
ए़ड वेस्टविकसोबत लग्न होण्याआधी अॅमी जॅक्सन ब्रिटीश व्यावसायिक एंड्रियास पानायियोटौ यांचा मुलगा जॉर्जसोबत रिलेशनशीपमध्ये होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर अॅमी आणि जॉर्ज या दोघांनी २०१९ मध्ये एकमेकांसोबत एंगेजमेंट केली. साखरपुड्यानंतर ८ महिन्यांनी अॅमीने मुलाला जन्म दिला होता. परंतु त्यानंतर अॅमी आणि जॉर्ज यांचं ब्रेकअप झालं. जॉर्जसोबत नातं तुटल्यावर अॅमीने एड वेस्टविकसोबत लग्न केलं. अॅमीने 'I', 'सिंग इज ब्लिंग', 'क्रॅक', '2.0' अशा बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये काम केलंय.