अनोळखी व्यक्तीच्या लग्नात साराने घातला होता गोंधळ; भरमांडवातून अनन्याने आणलं होतं खेचून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 02:37 PM2023-12-17T14:37:03+5:302023-12-17T14:37:34+5:30
Ananya pandey : साराने इतका गोंधळ घातला होता की नाइलाजाने तिला खेचून बाहेर आणावं लागलं.
बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे. त्यामुळे आज असंख्य कलाकारांची इंडस्ट्रीत रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. त्यातही अनन्या पांडे (Ananya Panday), सारा अली खान (Sara Ali Khan) , जान्हवी कपूर (janhavi kapoor) , सुहाना खान (suhana khan) हे स्टारकिडस सातत्याने चर्चेत येत असतात. यामध्येच सध्या सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघींची चर्चा रंगली आहे. अनन्या लवकरच 'खो गए हम कहाँ' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं सध्या अनन्या जोरदार प्रमोशन करत असून एका मुलाखतीमध्ये तिने साराची पोलखोल केली.
अलिकडेच अनन्याने पिंकव्हिलाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सारा अली खानने एका लग्नात धिंगाणा घातला होता असं सांगितलं. इतकंच नाही तर अखेर जबरदस्ती साराला या लग्नातून बाहेर आणालं लागलं असंही तिने सांगितलं. एकदा आम्ही सगळे जण जेवायला चाललो होते. त्यावेळी वाटेत आम्हाला जोरजोरात बॉलिवूड गाण्यांचा आवाज ऐकू आला. हे पाहून सारा म्हणाली, मी आत जातीये आणि डान्स करणार आहे. मग काय सारा खरोखरच त्या लग्नाच्या पार्टीत गेली आणि डान्स फ्लोअरवर जाऊन नाचू लागली. तिचं हे वागणं पाहून मला जबरदस्ती तिला खेचून तिथून बाहेर काढावं लागलं. मुळात हे एका अनोळखी लोकांच्या लग्नात घडलं, असं अनन्या म्हणाली.
सध्या अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत जोडलं जात आहे. अनेकदा या जोडीला एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची चर्चा होतीये. परंतु, अलिकडेच आदित्यने करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याला अनन्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्याने उत्तर देण्याचं टाळलं.
दरम्यान, अनन्या लवकरच खो गए हम कहाँ या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा २६ डिसेंबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी स्क्रीन शेअर करणार आहे.