ये है बॉम्बे मेरी जान! बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा रिक्षाने प्रवास, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 14:22 IST2023-10-20T14:18:06+5:302023-10-20T14:22:38+5:30
अनन्या पांडेने आज मुंबईच्या रस्त्यावर रिक्षातून प्रवास केला. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ये है बॉम्बे मेरी जान! बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा रिक्षाने प्रवास, व्हिडीओ व्हायरल
सेलिब्रिटींसह फोटा काढावा, त्यांच्यासह सेल्फी असावा,ऑटोग्राफ घ्यावा किंवा मग एक झलक तरी पाहायला मिळावी अशी फॅन्सची इच्छा असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एक अभिनेत्री मुंबईमध्ये रिक्षामध्ये फिरताना दिसली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनन्या पांडे आहे. मुंबईच्या ट्राफिकला कंटाळून तिने थेट रिक्षाच पकडला. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये ती ऑटोने प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये 'जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान...' हे गाणे वाजत आहे. अनन्या ऑटोमध्ये एका मैत्रिणीसोबत दिसत आहे, मात्र व्हिडीओमध्ये मैत्रिनीने चेहरा लपवला आहे.
अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तीचा नुकताच आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' सिनेमा रिलीज झाला. आता लवकरच ती 'खो गये हम कहाँ' या चित्रपटात दिसणार आहे. अर्जुन वरण सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अनन्या सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या आदित्य रॉय कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.