सिनेमाचं शूटिंग करताना सेटवर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जखमी, फोटो पाहून चाहत्यांना चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:09 IST2025-04-01T13:09:00+5:302025-04-01T13:09:41+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला सिनेमाच्या सेटवर दुखपतीला सामोरं जावं लागल्याची गोष्ट समोर आली आहे

सिनेमाचं शूटिंग करताना सेटवर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जखमी, फोटो पाहून चाहत्यांना चिंता
बॉलिवूड अभिनेत्री शूटिंग करताना जखमी झाल्याची बातमी समोर येतेय. शूटिंग करताना या अभिनेत्रीच्या पायाला चांगलीच दुखापत झाली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे दिव्या खोसला कुमार. दिव्या खोसला कुमारने (divya khosla kumar) सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी शेअर केलीय. दिव्याच्या पायाला दुखापत झाली असल्याने तिने सोशल मीडियावर पायाला बँडेज लावण्याचा फोटो शेअर केलाय.
शूटिंग करताना दिव्या झाली जखमी
पायाला मोठी जखम झाली तरीही दिव्याने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना अपडेट दिली आहे. आगामी सिनेमाचं शूटिंग करताना दिव्याच्या पायाला ही जखम झाल्याचं समजतंय. पायाला दुखापत होऊनही दिव्याने तिच्या प्रोजेक्टचं काम थांबवलं नाहीये. २०१४ मध्ये दिव्या खोसल कुमार दिग्दर्शित 'यारिया' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. हा सिनेमा लोकांना चांगलाच आवडला. हा सिनेमा री रिलीज करण्यासाठी दिव्या सध्या उत्सुक आहे.
दिव्या खोसला कुमारचे आगामी प्रोजेक्ट्स
दिव्याने २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'सावी' सिनेमात अभिनय केलाय. या सिनेमात दिल्यासोबत हर्षवर्धन राणे आणि अनिल कपूर हे कलाकार झळकले. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळला. सध्या दिव्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल कोणतीही माहिती समोर नाही. सध्या दिव्याला शूटिंग करताना दुखापत झाल्याने तिच्या चाहत्यांनी तिला आराम करायचा सल्ला दिलाय. दिव्या या दुखापतीमधून लवकरात लवकर सावरुन पुन्हा सक्रीय होईल, अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे. दिव्या ही सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्री असून T Series चे मालक भूषण कुमार यांची ती पत्नी आहे.