यूट्यूबर म्हणून करिअरची सुरूवात, पहिलाच सिनेमा ठरला सुपरफ्लॉप; २० मिनिटांच्या बोल्ड सीनमुळे बनली स्टार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 04:20 PM2024-03-15T16:20:26+5:302024-03-15T16:22:41+5:30
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडसारख्या चंदेरी दुनियेत एखाद्याने स्थिरावणं ही फार मोठी बाब आहे .
Tripti Dimri : आपल्या क्यूटनेसने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीने भल्या-भल्या आघाडीच्या नायिकांना मागे टाकलंय. एका सुपरफ्लॉप चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आता बनलीय सुपरस्टार नेमकी कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या...
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडसारख्या चंदेरी दुनियेत एखाद्याने स्थिरावणं ही फार मोठी बाब आहे . एकापेक्षा एक सिनेमे देऊनही बऱ्याच जणांना पाहिजे तितका स्टारडम मिळत नाही तर केवळ वीस मिनिटांचा सीनच एखाद्याचे नशीब उजळण्यासाठी पुरेसा असतो.
जर अजूनही तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून नॅशनल क्रश तृप्ती डिमरी आहे. तृप्तीनं आपल्या दिलखेचक अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. पण तृप्ती डिमरीचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. विप्रा डायलॉग नावाच्या यूट्यूब चॅनलपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. यामध्ये व्हिडिओंच्या माध्यमातून ती आपल्या अभिनयाची जादू दाखवत असे.
साधारणत: २०१८ साली आलेल्या ‘लैला मजनू’ या रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपटात तृप्ती डिमरीने मुख्य भूमिका साकारली होती. हा तिचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. त्यानंतर तिला ॲनिमल’ या चित्रपटात स्टाटर रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना सोबत काम करण्याची संधी मिळाली. याच संधीच सोनं करत अभिनेत्री तृप्ती डिमरीने सिनेमात तिची विशेष छाप सोडली. या चित्रपटातील तिची रणबीर कपूर बरोबरची केमिस्ट्री अनेकांना आवडली, यामुळे तृप्ती आता सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरीनं आतापर्यंत ‘बुलबुल’, ‘कला’ सारख्या दमदार सिनेमात काम केलं आहे. ‘अॅनिमल’ सिनेमात तिनं जोया नावाची भूमिका साकारली आहे. सिनेमात रणबीरबरोबर तिनं २० मिनिटांचे बोल्ड आणि न्यूड सीन्स दिले आहेत. बोल्ड सीन्समुळे तृप्तीला अनेकांनी ट्रोल केलं. पण तिच्या आतापर्यंतच्या सगळ्या सिनेमातील तिची ही भूमिका अत्यंत वेगळी आणि प्रभावशाली ठरली आहे. अभिनेत्रीला त्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.