६२ वर्षीय अभिनेत्रीने जीममध्ये १०० किलोंचं वजन उचलून केला व्यायाम, वर्कआऊट व्हिडीओ पाहून सर्व थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:05 IST2024-08-23T13:03:21+5:302024-08-23T13:05:11+5:30
बॉलिवूडमधील ६२ वर्षीय अभिनेत्रीचा जीममधील व्हिडीओ व्हायरल झाला असून तिने केलेलं वर्कआऊट पाहून सगळेच थक्क झालेत

६२ वर्षीय अभिनेत्रीने जीममध्ये १०० किलोंचं वजन उचलून केला व्यायाम, वर्कआऊट व्हिडीओ पाहून सर्व थक्क
बॉलिवूड सेलिब्रिटी फिट अँड फाईन राहण्यासाठी कसून व्यायाम करताना दिसतात. अभिनयासोबतच स्वतःच्या फिटनेसकडेही हे सेलिब्रिटी तितकंच लक्ष देतात. वयाची पन्नाशी उलटली तरीही सेलिब्रिटी फिट अँड फाईन पाहायला मिळत आहेत. अनिल कपूर, शाहरुख खान, अक्षय कुमार हे अभिनेते असो किंवा नीना गुप्ता, श्वेता तिवारी, शिल्पा शेट्टी या अभिनेत्री असो. हे कलाकार कायमच तंदुरुस्त दिसतात. एका ६२ वर्षीय अभिनेत्रीचा असाच एक व्हिडीओ समोर येतेय. १०० किलो वजन उचलून ही अभिनेत्री व्यायाम करताना दिसतेय. या अभिनेत्रीचं नाव अनीता राज.
अनीता राज यांचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल
अनीता राज यांच्या वयाची साठी ओलांडली तरीही त्या एकदम फिट अँड फाईन दिसतात. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्या जीममध्ये घाम गाळताना दिसतात. अनिता यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत जीममध्ये अनिता १०० किलोंचं वजन उचलून व्यायाम करताना दिसतात. वयाच्या ६२ व्या वर्षी अनिता यांचं हेवी वर्कआऊट बघून सर्वच जण थक्क झाले आहेत. अनिता यांच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी आश्चर्य व्यक्त केलं असून कमेंट केल्या आहेत.
अनीता यांची फिल्मी कारकीर्द
अनिता यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. यात त्यांनी सांगितलं, "वय हा फक्त आकडा असतो. फिट अँड फाईन राहण्यासाठी वय हा कधीच अडथळा असू शकत नाही." अशा शब्दांमध्ये अनिता यांनी त्यांच्या फिटनेसचं सीक्रेट सांगितलं आहे.अनिता या सध्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय हिंदी मालिकेत काम करत आहेत. याशिवाय त्यांनी अनिल कपूरसोबत '24' या मालिकेतही काम केलंय.