"कमरेवर हात न ठेवता त्याने माझ्या...", इंटिमेट सीनबद्दल बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 10:57 IST2025-04-03T10:54:42+5:302025-04-03T10:57:03+5:30

इंटिमेट सीन्सबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, काय म्हणाली?

bollywood actress anupriya goenka revealed about costar touched her body during intimate scene | "कमरेवर हात न ठेवता त्याने माझ्या...", इंटिमेट सीनबद्दल बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

"कमरेवर हात न ठेवता त्याने माझ्या...", इंटिमेट सीनबद्दल बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

Anupria Goenka : हल्ली चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स हे अगदी सऱ्हासपणे दाखवले जातात. परंतु चित्रपटांसाठी हे इंटीमेट सीन देणं ही सोपी गोष्टी नसते. असे सीन देण्यासाठी कलाकारांना असंख्य अडचणींचा सामोरं जावं लागतं. सध्याच्या काळात असे सीन्स केवळ चित्रपटांपूरता मर्यादित न राहता मालिका तसंच वेब सीरिजमध्ये देखील पाहायला मिळतात. याचबद्दल एका लोकप्रिय अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. नुकताच अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाने (Anupria Goenka) इंटीमेट सीन देतानाचा अनुभव सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने बऱ्याचं गोष्टींचा खुलाला केला. दरम्यान, चित्रपटामध्ये इंटीमेट सीन शूट करताना दडपण येत असल्याचं सुद्धा तिने सांगितलं. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, "माझ्याबाबतीत असं दोनदा घडलं आहे. मी असंही म्हणणार नाही की तो माणूस संधीचा फायदा घेत होता. मला जाणवत होतं की तो खूप उत्साहित झाला आहे पण, मुळात असं घडायला नको होतं. तेव्हा तुम्हाला अपमानित झाल्यासारखं आणि अस्वस्थ वाटू लागतं. माझ्यासोबत किसिंग सीन दरम्यान हा प्रकार घडला."

त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "त्यादरम्यान, मी असे कपडे घातले होते ज्यामध्ये मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. मला असं वाटत होती की सहकलाकार एक पुरुष असल्याने अशा दृश्यांमध्ये स्त्रीला कंबरेला धरून ठेवणे सोपे आहे, हे त्याला समजेल. पण त्याने जवळजवळ माझ्या शरीराच्या पार्श्वभागावर हात ठेवला, ज्याची काहीच गरज नव्हती, तो माझ्या कमरेवर सुद्धा हात ठेवू शकला असता. त्यानंतर मग मी त्याचे हात थोडे वर घेतले आणि त्याला खाली नव्हे तर योग्य त्या ठिकाणी धरायला सांगितलं. पण त्या क्षणी मी त्याला हे का केलं? याबद्दल विचारू शकले नाही. कारण, तो सहज म्हणेल की ती एक चूक होती."

वर्कफ्रंट

अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने  सलमान खान आणि हृतिक रोशनसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'बॉबी जासूस' आणि 'पद्मावत' यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. याशिवाय ‘बॉबी जासूस’, ‘माया’,‘ढिशूम’ अशा अनेक हिंदी, तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Web Title: bollywood actress anupriya goenka revealed about costar touched her body during intimate scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.