युट्यूब चॅनल लॉन्च केलं अन् तासाभरातच झालं हॅक; व्हिडीओ शेअर करत अर्चना पूरण सिंगने सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:36 IST2024-12-16T13:30:10+5:302024-12-16T13:36:30+5:30
अर्चना पुरण सिंग (Archana Puran Singh) या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

युट्यूब चॅनल लॉन्च केलं अन् तासाभरातच झालं हॅक; व्हिडीओ शेअर करत अर्चना पूरण सिंगने सांगितली आपबीती
Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. बॉलिवूड सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. अलिकडेच अभिनेत्री 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मुळे चर्चेत होती. परंतु सद्या अर्चना पूरण सिंगने युट्यूबर पदार्पण केलं आहे. अलिकडेच तिने ब्लॉगिंग करण्यास सुरूवात केली. विनोदी शैलीसाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री नव्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न करत होती. पण तिचा हा प्रयत्न असफल ठरला. अभिनेत्रीने नवं युट्यूब चॅनेल लॉन्च केलं आणि तासाभरात ते अज्ञाताकडून हॅक करण्यात आलं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट करत अर्चनाने चाहत्यांना माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "मित्रांनो, मी कालच नवीन युट्यूब चॅनेल लॉन्च केलं आणि त्याला काही क्षणातच लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले. तुमचं हे प्रेम पाहून मी भारावून गेले. परंतु, मला एक गोष्ट सांगताना प्रचंड वाईट वाटतंय की काल रात्री २ च्या सुमारास माझं अकाउंट हॅक करण्यात आलंय. हे सगळं कसं घडलं? याबद्दल माला कोणतीही कल्पना नाही."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "तुमचं हे प्रेम कायम असंच राहुद्या! माझी संपूर्ण टीम आणि यु्ट्यूबची टीम अकाउंट पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.मला आशा आहे लवकरच या चॅनलच्या माध्यमातून आपण सगळे पुन्हा एकदा भेटू."
अर्चना पूरण सिंगचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते सपोर्ट करताना दिसत आहेत. त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय, "काही फरक नाही, आम्ही तुमची वाट पाहतोय मिस ब्रिगेंझा..." तर आणखी एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलंय, "तुम्ही खूप चांगल्या आहात, सगळं काही ठिक होईल..."