मराठमोळी अभिनेत्री Bhumi Pednekar, समीक्षानं शेअर केला Photo; फॅन्स म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 08:28 AM2021-10-14T08:28:34+5:302021-10-14T08:28:34+5:30
Bhumi Pednekar photo viral on Social Media : बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर हीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि तिची बहीण समीक्षा पेडणेकर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या महिन्यात भूमी आपल्या बहिणीसोबत स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. याच ठिकाणचा एक फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 'दम लगा के हईशा' या चित्रपटातून भूमी प्रकाशझोतात आली होती.
भूमीनं शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. भूमीनं आपल्या स्पॅनिश आऊटींगसाठी एक शिमरी हॉल्टर नेकलाईन ग्रॅश-ब्लॅक बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. यासोबतच तिनं मिनी-चेन शोल्डर बॅग, फ्युचरिस्टिक ब्लॅक-टिंटेड सनग्लासेस, ब्रेसलेट आणि मेटॅलिक नेलपेंटसोबत मॅच केलं होतं. यादरम्यान तिची बहीण समीक्षा हिनंही सुंदर असा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसून येत आहे.
भूमीनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत #pednekarsisters #love #familia असंही लिहिलं आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. शेकडो लाईक्स व्यतिरिक्त अभिनेता वरून धवननंही त्यांच्या या फोटोवर लाईक आणि कमेंट केलं आहे. एका युझरनं माय स्लेईंग क्विन्स, तर एका युझरनं एका फ्रेममध्ये दोन बहीणी, सो क्युट, तर एका फॅनपेजवरून समीक्षाच्या ड्रेसबाबतही कमेंट करण्यात आलं आहे.
वर्कफ्रन्टबद्दल सांगायचं झालं तर भूमी तिच्या आगामी चित्रपट 'रक्षा बंधन' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अक्षय कुमार आणि सादिया खतीबही असतील. भूमी अनेकदा सोश मुद्द्यांवरही व्यक्त होताना दिसते. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.