किती गोड! २ वर्षांची झाली बिपाशा बासूची लेक; अभिनेत्रीने मालदीवमध्ये केलं बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:09 PM2024-11-13T16:09:05+5:302024-11-13T16:17:55+5:30
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांची मुलगी दोन वर्षांची झाली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या लेकीचा वाढदिवस दणक्यात साजरा केला.
Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोवर(karan Singh Grover) यांची मुलगी देवी दोन वर्षांची झाली आहे. नुकताच तिचा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करण्यात आला. अभिनेत्री बिपाशा बासू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. अनेकदा बिपाशा लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. करणशी लग्न केल्यानंतर बिपाशा फारशी कुठे दिसली नाही. २०१८ पासून तिने सिनेसृष्टीपासून दूर राहणं पसंत केलं आहे. सध्या ती तिचं मदरहूड एन्जॉय करत आहे. अशातच लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. बिपाशाने सोशल मीडियावर तिची लेकीचा बीचवर खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केल्याचा पाहायला मिळतोय.
इन्स्टाग्रामवर बिपाशाने या व्हिडीओला सुंदर असं कॅप्शन देत त्यामध्ये लिहलंय, "Our cub - Simba is 2, ‘हकुना मटाटा’ म्हणजेच आमची जीवनशैली आहे. कळलंच नाही वेळ कसा निघून गेला आणि देवी २ वर्षांची झाली". बिपाशाने यंदा मुलीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन मालदीवमध्ये केलं आहे. या व्हिडीओमध्ये देवीचा क्यूट अंदाज पाहायला मिळतो. शिवाय तिने बॅकग्राउंडला 'हकुना मटाटा’ हे गाणं लावलं आहे. दरम्यान, मालदीवमध्ये बीचवर बिपाशा-करणची लेक वाळूमध्ये धावताना, मजामस्ती करताना दिसते आहे. त्यादरम्यान तिने समुद्रकिनारीच तिचा वाढदिवस साजरा केल्याचं पाहायला मिळतंय. फुग्यांचं डेकोरेशन तसेच छोटा केके देखील व्हिडीओमध्ये दिसतो.
अभिनेत्री बिपाशा बासू लग्नानंतर ६ वर्षांनी आई झाली. १२ नोव्हेंबरला तिच्या लेकीचा वाढदिवस असतो. बिपाशा व करण सिंग ग्रोव्हर कन्येच्या आगमनाने सुखावले.