VIDEO: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणची धमाल; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 09:57 AM2024-12-07T09:57:49+5:302024-12-07T10:03:22+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) काही महिन्यांपूर्वीच आई झाली. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर २०२४ रोजी तिने मुलीला जन्म दिला. तिच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. सध्या बॉलिवूडचं स्टार कपल रणवीर आणि दीपिका त्यांच्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दीपिका तिच्या लाडक्या लेकीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. अलिकडे रणवीर आणि दीपिका त्यांची लेक दुआसोबत एकत्र स्पॉट झाले होते. परंतु लेकीच्या जन्मानंतर दीपिकाने सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळलं होतं. परंतु सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा पादुकोणच्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
सध्या लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) लाईव्ह कॉन्सर्टची सगळीकडे चर्चा आहे. त्याची 'दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४' जगभरात सुरू आहे. अशातच दिलजीतचा बंगळूरुमधील कॉन्सर्टचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला. कारण या कॉन्सर्टमध्ये पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाने हजेरी लावली. दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये जाण्याचा मोह तिला आवरला नाही. लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्री पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
भारतात दिल्लीपासून 'दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४' मधील कॉन्सर्टची सुरुवात झाली. सध्या भारतात विविध ठिकाणी दिलजीतचे कॉन्सर्ट होतं आहेत. दरम्यान, दिलजीतच्या बंगळूरू येथील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दीपिकाने जाऊन चाहत्यांना अनोखं सरप्राइज दिलं. पण, खऱ्या अर्थाने या कॉन्सर्टमध्ये मजा तेव्हा आली जेव्हा दिलजीतने खास अंदाजात दीपिकाचं स्वागत करून स्टेजवर बोलावलं. या व्हिडीओमध्ये दीपिकाबद्दल बोलताना दिलजीत म्हणतो- "तुम्हाला विश्वास बसेल का? आपल्यासोबत या ठिकाणी दीपिका पादुकोण आहे. किती सुंदर पद्धतीने तिने बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर अभिनेत्रीने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. "असं दिलजीत म्हणतो.
दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणने चाहत्यांसोबतही संवाद साधला. दिलजीतने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींनीही तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. "क्वीन दीपिका पादुकोण ऑन दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४ मध्ये" असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.