'कंगुआ' फेम अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची मोठी फसवणूक; ५ जणांच्या टोळीने घातला २५ लाखांचा गंडा! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 10:36 AM2024-11-16T10:36:03+5:302024-11-16T10:41:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

bollywood actress disha patani father jagdish singh patani duped rs 25 lakh by fraudsters case has been registered | 'कंगुआ' फेम अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची मोठी फसवणूक; ५ जणांच्या टोळीने घातला २५ लाखांचा गंडा! नेमकं प्रकरण काय?

'कंगुआ' फेम अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची मोठी फसवणूक; ५ जणांच्या टोळीने घातला २५ लाखांचा गंडा! नेमकं प्रकरण काय?

Disha Patani :बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या (Disha Patani)वडिलांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अभिनेत्रीचे वडील जगदीश सिंह यांना ५ लोकांच्या ग्रुपने सरकारी विभागामध्ये उच्च पदाचे आमिष दाखवून त्यांना लाखोंचा गंडा घातला आहे. दरम्यान, याप्रकरणी बरेली येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शुक्रवारी १५ नोव्हेंबरच्या दिवशी हा प्रकार उडकीस आला. 

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, जगदीश पाटनी यांनी सुरूवातीला ५ लाखांची रोख रक्कम आणि २० लाख रुपये तीन वेगवेगळ्या अकाउंटमधून आरोपींना ट्रान्फर केल्याचं सांगण्यात येतंय. शिवाय तीन महिन्यानंतरही काम न झाल्यास पेसै वापस करण्यात येतील अशी खात्री आरोपीत व्यक्तीने दिली होती. परंतु अभिनेत्रीच्या वडिलांनी पैसे मागायला सुरुवात केली त्यानंतर जगदीश यांनी ते धमकी देऊ लागले. त्यांना भीती दाखवण्यात आली. 

कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी डीके शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, शिवेंद्र प्रताप सिंह, दिवाकर गर्ग तसेच आचार्य जयप्रकाश, प्रीती गर्ग यांव्यतिरिक्त एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हेगारी हेतू आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. 

अभिनेत्री दिशा पाटनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकताच तिचा 'कंगुआ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. साऊथ स्टार सूर्या, बॉबी देओल यांच्यासोबत अभिनेत्री स्क्रीन शेअर करताना दिसते आहे. 

Web Title: bollywood actress disha patani father jagdish singh patani duped rs 25 lakh by fraudsters case has been registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.