Lockdown : कधी न बोलणारी दिव्या खोसला अचानक केजरीवालांवर बसरली, सोशल मीडियावर ट्रोल झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:53 PM2020-03-31T13:53:15+5:302020-03-31T13:54:33+5:30
टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार कधी नव्हे इतकी अॅक्टिव्ह झाली आहे.
टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार कधी नव्हे इतकी अॅक्टिव्ह झाली आहे. आत्तापर्यंत केवळ स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेत राहणा-या दिव्या खोसला कुमारने अचानक असे काही केले की, सगळेच चकीत झालेत. केवळ इतकेच नाही तर तिच्यामुळे सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला. आता हा नेमका मामला काय ते वाचा.
तर झाले असे की, दिव्या खोसला कुमारने एक ट्विट केले आणि तिच्या ट्विटनंतर सोशल मीडियावरचे युजर्स दोन भागात विभागले गेले. आपल्या ट्विटमध्ये दिव्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले.
As an upset Indian citizen, I would like to ask Mr. @ArvindKejriwal ...In most difficult times like these when the country needs funds, why are you spending crores of money on your personal advertisements on news channels?
— Divya Khosla Kumar (@iamDivyaKhosla) March 30, 2020
कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी अख्खा देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात हातावर पोट असणा-यांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने हजारो मजूर, कामगार प्रसंगी पायपीट करून स्थलांतर करत आहेत. दिल्लीतून हजारो मजुरांचे स्थलांतर सुरु आहे. दिल्ली सरकार या मजुरांच्या मदतीसाठी अनेक स्तरावर अपयशी ठरल्याचे आरोपही होत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिव्याने केजरीवालांना लक्ष्य केले.
‘ संपूर्ण देशाला याघडीला निधीची गरज असताना केजरीवाल न्यूज चॅनलवर स्वत:च्या खासगी जाहिरातींवर इतका पैसा का खर्च करत आहेत? एक व्यक्ति नागरिक या नात्याने मी अरविंद केजरीवालांना हा प्रश्न विचारते आहे,’ असे ट्विट दिव्याने केले.
I am not seeing c.m of any indian state briefing media every 2nd day on national t.v, please let me know if u r seeing any other state c.m on channels like zee news, india tv, news24, abp,news18 etc.he is repeating the same thing what our p.m has already said. Why this pr stunt.
— ~~Nitin~~ (@OmNamaahShivaya) March 30, 2020
U need to watch this .
— Rakesh Kumar (@AAPKA_RK) March 30, 2020
Get well soon pic.twitter.com/ZcpqbSU7pg
दिव्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर जणू घमासान सुरु झाले. अनेकांनी दिव्याची बाजू घेऊन केजरीवालांना निशाणा बनवणे सुरु केले तर काहींनी यावरून केजरीवालांची पाठराखण करत, दिव्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
Why not ask Mr. Modi the same question
— Waqar Ahmad (@WaqarShan927) March 30, 2020
हाच प्रश्न तू मोदींना किंवा केंद्रीय नेत्यांना का विचारत नाहीस, अशा शब्दांत काही युजर्सनी दिव्याला ट्रोल केले.
दिव्याच्या पतीने दिलेत 11 कोटी
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिव्याचे पती भूषण कुमार यांनी पीएम केअर्स फंडात 11 कोटींची मदत दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोषातही त्यांनी 1 कोटींची मदत दिली आहे.