दिया मिर्झाच्या प्रोजेक्टमध्ये मराठी कलाकारांची फौज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यालाही मिळाली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 17:03 IST2024-03-26T16:49:50+5:302024-03-26T17:03:20+5:30
९० च्या दशकात आपल्या अदाकारिने तसेच अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा.

दिया मिर्झाच्या प्रोजेक्टमध्ये मराठी कलाकारांची फौज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यालाही मिळाली संधी
Dia Mirza : 'रहना है तेरे दिल मैं' या चित्रपटातून दिया मिर्झा नावारुपाला आली.आपल्या गोड आवाजाने आणि सौंदर्याने तिनं चाहत्यांची मनं देखील जिंकली. सध्या ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणाने चर्चेचा मुद्दा बनली आहे. अभिनयात नशीब अजमावल्यानंतर आता दिया मिर्झा तिच्या नव्या इनिंगला सुरूवात करतेय. 'पन्ह' या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दिया प्रोडक्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.
लवकरच दिया तिच्या आगामी प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'पन्ह' असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती आहे. यामध्ये बऱ्याच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना झळकण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप तसेच मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवची देखील वर्णी लागली आहे. यासंदर्भात पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “हृदयाच्या कोपऱ्यातला अत्यंत लाडका प्रोजेक्ट..’पन्हं'”, असं कॅप्शन लिहीत त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केल्याचं पाहायला मिळतंय.
याशिवाय अभिनेत्री सायली संजीव देखील दियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. अभिनेत्री सायली संजीवने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रोजेक्टसंबंधित चाहत्यांनी माहिती दिली आहे. “Blessed to be part of this amazing project,” असं लिहून तिने देखील स्टोरी शेअर केली आहे.