मुलांने वाºयावर सोडलेल्या ‘पाकिजा’ची अभिनेत्री गीता कपूरची अखेर वृद्धाश्रमात रवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 01:22 PM2017-05-31T13:22:03+5:302017-05-31T18:52:03+5:30

मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘पाकिजा’मधील अभिनेत्री गीता कपूर यांची अखेर वृद्धाश्रमात रवानगी करण्यात आली. मुलगा ...

Bollywood actress Geeta Kapur will finally leave for her old age! | मुलांने वाºयावर सोडलेल्या ‘पाकिजा’ची अभिनेत्री गीता कपूरची अखेर वृद्धाश्रमात रवानगी!

मुलांने वाºयावर सोडलेल्या ‘पाकिजा’ची अभिनेत्री गीता कपूरची अखेर वृद्धाश्रमात रवानगी!

googlenewsNext
ंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘पाकिजा’मधील अभिनेत्री गीता कपूर यांची अखेर वृद्धाश्रमात रवानगी करण्यात आली. मुलगा राजा याने आई गीता यांना दवाखान्यात दाखल करून पळ काढला होता. तेव्हापासून त्या साश्रू नयनांनी त्याची प्रतीक्षा करीत होते; मात्र त्याने आपल्या आईच्या वेदना जाणून न घेता एकदाही रुग्णालयात येण्याची तसदी घेतली नसल्याने रुग्णालय प्रशासनाला त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

एका वेबसाइटशी बोलताना निर्माता अशोक पंडित यांनी सांगितले की, पुढील दोन-तीन दिवसांत ‘पाकिजा’ आणि ‘रजिया सुलतान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनेत्री गीता यांची रुग्णालयातून वृद्धाश्रमात रवानगी करण्यात येणार आहे. अशोक पंडित यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गीता यांचा मुलगा राजा याचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु अद्यापपर्यंत पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. 



२१ एप्रिल रोजी कमी रक्तदाबाच्या कारणास्तव राजाने आई गीता यांना गोरेगाव, मुंबई स्थित एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तो तेथून फरार झाला होता. एक महिना संपूनही राजा आईला भेटायला आला नसल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. राजाला फोन केला असता, त्याचा फोन बंद सांगितला जात असून, तो त्याच्या मूळ पत्त्यावरदेखील राहत नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे राजा कुठे गेला असावा, याविषयी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 



दरम्यान, आपला मुलगा एकदाही रुग्णालयात भेटायला आला नसल्याने गीता यांना अश्रू अनावर झाले. त्या सारख्या रडून आपली व्यथा सांगत असल्याने अनेकांना धक्काच बसला आहे. शिवाय त्यांच्याकडे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने अन् राहण्यासही जागा नसल्याने त्यांना वृद्धाश्रमात हलविण्यात यावे असा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. दरम्यान रुग्णालयाच्या बिलाचे तब्बल १.५ लाख रुपये अशोक पंडित आणि निर्माता रमेश तौरानी यांनी भरले आहेत. त्यामुळे गीता यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करण्यात येणार आहे. 

Web Title: Bollywood actress Geeta Kapur will finally leave for her old age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.