"कोणासाठी इकडे आला आहात?" हेमा मालिंनीची पापाराझीवर नाराजी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात-
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:22 AM2024-10-22T10:22:12+5:302024-10-22T10:24:38+5:30
हेमा मालिनी त्यांना भेटायला आलेल्या मीडियावर भडकलेल्या दिसल्या. परंतु हेमा यांचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सकडून नाराजीचे सूर उमटले आहेत
बॉलिवूडच्या 'ड्रीम गर्ल' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी. हेमा मालिनी यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. हेमा मालिनींचे 'शोले', 'सीता और गीता', 'बागबान', 'नसीब', 'क्रांती' असे अनेक सिनेमे चांगलेच गाजले. हेमा मालिनी गेली अनेक वर्ष लोकांचं मनोरंजन करत आहेत. इतकंच नव्हे त्या दरवर्षी कृष्णजन्मोत्सवाच्या दिवशी नृत्य करुन सर्वांना थक्क करुन सोडतात. परंतु नुकताच हेमा मालिनींचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत त्यांनी पापाराझींवर नाराजी व्यक्त केलीय.
हेमा मालिनींची पापाराझींवर नाराजी
हेमा मालिनींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत त्या चालत येताना दिसतात. नंतर पापाराझींना बघताच त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसते. "कोणासाठी इकडे आला आहात?" असं त्या पापाराझींना बोलताना दिसतात. पुढे सर्व त्यांना "हॅपी दिवाली" म्हणतात. हेमा सुद्धा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. पुढे त्या इशाऱ्याने सर्वांना बाजूला व्हायला सांगतात. नंतर एक माणूस त्यांच्यासोबत फोटो काढायला येतो. हेमा मालिनी लांबूनच त्याच्यासोबत फोटो काढतात.
हेमा मालिनींवर नेटकऱ्यांचे नाराजीचे सूर
हेमा मालिनींचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांचा स्वभाव बघून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय. "ज्यूनियर जया बच्चन", "जया पार्ट २", "किती तो अॅटिट्यूड", "सामान्य माणसांना हे लोक काय समजतात", अशा प्रतिक्रिया देऊन हेमा मालिनींवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. हेमा मालिनींचा गेल्या काही वर्षांपासून कोणताही नवीन सिनेमा आला नाहीय. तरीही त्या अनेकदा स्टेजवर नृत्य करताना दिसतात.