'गुलाबी साडी'वर इशा कोप्पीकरने केला बॉलिवूड स्टाइल डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:24 IST2024-04-24T17:20:39+5:302024-04-24T17:24:41+5:30
Isha Koppikar: इशाने इन्स्टाग्रामवर नुकताच तिचा व्हिडीओ शेअर केला आहे.

'गुलाबी साडी'वर इशा कोप्पीकरने केला बॉलिवूड स्टाइल डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'गुलाबी साडी' हे गाणं तुफान ट्रेंड झालं आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रील्स करुन ते पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे या गाण्याची भुरळ आता बॉलिवूड कलाकारांनाही पडतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्रीने (bhagyashree) या गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर आता इशा कोप्पीकरनेही (ish koppikar) या गाण्यावर ताल धरला आहे.
इशाने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने गुलाबी साडीवर रील शेअर केलं आहे. विशेष म्हणजे इशाने सगळ्यांसारख्याच सेम डान्स स्टेप न करता या गाण्याला बॉलिवूड टच दिला आहे.
इशाने बॉलिवूड स्टाइलमध्ये हा डान्स केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. इतरांपेक्षा काही तरी वेगळं, चांगलं केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये इशाने गुलाबी रंगाची साडी नेसली असून 'गुलाबी साडी आणि गुलाबी मूड', असं कॅप्शनही तिने दिलं आहे.