VIDEO: 'लव्हयापा' मधील ट्रेंडिंग गाण्यावर खुशी अन् जान्हवी कपूरची मजेशीर रील; बोनी कपूरही दिसले सोबतीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 09:55 IST2025-01-08T09:51:22+5:302025-01-08T09:55:29+5:30
खुशी कपूरने सोशल मीडियावर तिचा आगामी चित्रपट 'लव्हयापा'मधील ट्रेंडिंग गाण्यावर मजेशीर रील बनवला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

VIDEO: 'लव्हयापा' मधील ट्रेंडिंग गाण्यावर खुशी अन् जान्हवी कपूरची मजेशीर रील; बोनी कपूरही दिसले सोबतीला
Khushi Kapoor Video: 'द आर्चीस' फेम खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) रोम-कॉम चित्रपट लव्हयापमुळे प्रसिद्धीझोतात आले आहेत. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अलिकडेच 'लव्हयापा 'चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं. लव्हयापा सिनेमातील या टायटल ट्रॅक आहे. सध्या या गाण्याची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळते. आता कपूर कुटुंबीयांना सुद्धा या गाण्याची भूरळ पडली आहे. फेम खुशी कपूरसह अभिनेत्री जान्हवी कपूर आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी या 'लव्हयापा'मधील ट्रेंडिंग गाण्यावर मजेशीर रील तयार केला आहे. जो चर्चेत आहे.
खुशी कपूरने या व्हिडीओला "निकला था लव्ह करने पर पापा आ गया..." असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या व्हिडीओमध्ये जान्हवी-खुशीने डोळ्यांना गॉगल लावून लव्हयापा गाण्यातील हुकस्टेप्स करताना दिसतायत. त्यात अचानक गाण्याच्या मध्येच बोनी कपूर यांची एन्ट्री होते. आपल्या वडिलांची असा अभिनय पाहून जान्हवी आणि खुशी दोघीही हसू लागतात.
दरम्यान, खुशी कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओवर हिंदी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजय कपूर यांनी या बाप-लेकींच्या व्हिडीओवर जेव्हा मजेशीर प्रतिक्रिया देत जान्हवी-खूशीचं कौतुक केलंय. तर जान्हवीच्या रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पाहारियाने देखील बोनी कपूर यांना सुपरस्टार म्हणत अशी केल्याची पाहायला मिळतेय.
'लव्हयापा' हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित आहे. हा चित्रपट २०२२ साली आलेल्या तमिळ 'हिट लव्ह टुडे' चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. येत्या ७ फेब्रुवारीला २०२५ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.