"तू तुझ्या चेहऱ्यावर सर्जरी करून..."; निर्मात्याच्या मागणीनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा चढला पारा, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:02 IST2025-03-26T12:01:09+5:302025-03-26T12:02:36+5:30

बॉलिवूड अभिनेत्रीला निर्माता असं काय म्हणाला की अभिनेत्रीचा पारा चढला. जाणून घ्या

bollywood actress kalki koechlin producer talk her to do fillers for laughter lines | "तू तुझ्या चेहऱ्यावर सर्जरी करून..."; निर्मात्याच्या मागणीनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा चढला पारा, नेमकं काय घडलं?

"तू तुझ्या चेहऱ्यावर सर्जरी करून..."; निर्मात्याच्या मागणीनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा चढला पारा, नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्रींना अनेकदा कास्टिंग काऊचच्या प्रकारांना सामोरं जावं लागतं. कधीकधी त्यांना निर्माते किंवा कास्टिंग दिग्दर्शकांकडून सिनेमात काम मिळवून देण्याच्या बदल्यात विचित्र मागण्यांना सामोरं जावं लागतं. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने खुलासा की, निर्मात्यांनी एक विचित्र मागणीच केल्याने काट्या चमच्याचा वापर करुन निर्मात्याला मारावंसं वाटत होतं. ही अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलिन. काय म्हणाली कल्की? (kalki koechlin)

कल्कीने बीबीसी वर्ल्ड सर्विसला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. एका सिनेमाच्या निर्मात्यांनी तिला चेहऱ्याची सर्जरी करुन लाफ्टर लाईन ठीक करायला  सांगितलं. हे ऐकताच कल्कीचा पारा चांगलाच चढला. काटा चमचा घेऊन तिला त्या निर्मात्याला मारायचं मन झालं होतं. दुपारी जेवताना हा प्रसंग घडला होता. पुढे कल्कीने स्वतःला शांत केलं आणि निर्मात्याचं बोलणं हसण्यावारी नेलं.

चेहऱ्यामुळे कल्कीवर लहानपणापासून दबाव
कल्की याच मुलाखतीत पुढे म्हणाली की, तिच्या चेहऱ्यामुळे तिला समाजाचं खूप प्रेशर यायचं. याशिवाय अनेक लहान मुलांच्या मनात चेहऱ्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो, याशिवाय त्यांच्या मनात वेगळाच दबाव असतो, याविषयी कल्कीने भाष्य केलं. कल्कीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'एम्मा और एंजल' या आगामी इंग्रजी सिनेमात दिसणार आहे. कल्की सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची एक्स पत्नी आहे.

Web Title: bollywood actress kalki koechlin producer talk her to do fillers for laughter lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.