"कोणी भाड्यानेही घर द्यायला तयार नव्हतं..." अनुराग कश्यपसोबत घटस्फोट झाल्यानंतर कल्की कोचलीनची झाली होती अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 09:07 IST2024-11-30T09:05:20+5:302024-11-30T09:07:02+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनने (Kalki Koechlin) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष स्वत कडे वेधलं.

"कोणी भाड्यानेही घर द्यायला तयार नव्हतं..." अनुराग कश्यपसोबत घटस्फोट झाल्यानंतर कल्की कोचलीनची झाली होती अशी अवस्था
Kalki Koechlin: बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनने (Kalki Koechlin) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष स्वत कडे वेधलं. अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करून अभिनेत्रीने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. कल्की कोचलीननेअनुराग कश्यपच्या (AnuraG Kashyap) 'देव डी' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुकही करण्यात आलं. परंतु कल्की तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे ती सर्वात जास्त चर्चेत आली. २०१५ मध्ये कल्कीने प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर अभिनेत्रीला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला त्यावर कल्की कोचलीनने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
नुकतीच अभिनेत्री कल्की कोचलीन हिने आफ्टर हॉर्स विथ ऑल अबाउट ईव या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्या दरम्यान मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "अनुराग आणि माझा घटस्फोट झाल्यानंतर माझे दोन बिग बजेट चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'ये जवानी है दिवानी' पडद्यावर आले. सगळं काही सुरळीत चालू असताना तेव्हा आमचा घटस्फोट झाला."
पुढे कल्की म्हणाली, "त्यावेळी मला मुंबईत राहण्यासाठी घर नव्हतं त्यासाठी मला प्रचंड संघर्ष करावा लागला. शिवाय कोणी मला भाड्यानेही घर द्यायला तयार नव्हतं. मी त्यांना तेव्हा म्हणाले की, मी एक सेलिब्रिटी आहे. माझ्यासोबत तुम्हाला सेल्फी घ्यायला आवडते पण, तुम्हाला मला घर द्यायचं नाही." त्यामुळे अभिनेत्री कल्की कोचलीनला घरासाठी वणवण करावी लागली.
लग्नाच्या ४ वर्षातच झाले विभक्त
कल्की आणि अनुराग कश्यप यांचा भेट २००८ मध्ये 'देव डी' चित्रपटाच्या सेटवर झाली. याच चित्रपटातून कल्कीने बॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू केला. त्यानंतर जवळपास २ वर्षे कल्की आणि अनुराग एकमेकांना डेट करत होते. अखेर २०११ मध्ये ते लग्नबंधनात अडकले. परंतु मतभेदांमुळे त्यांनी लग्नाच्या ४ वर्षानंतर घटस्फोट घेतला आणि आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.