Kangana Ranaut meets Yogi Adityanath: “प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत, साम्राज्य वाढो”; कंगना रनौतच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 08:21 AM2021-10-02T08:21:24+5:302021-10-02T08:24:28+5:30

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली.

bollywood actress kangana ranaut meets cm yogi adityanath and give best wishes for up election 2022 | Kangana Ranaut meets Yogi Adityanath: “प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत, साम्राज्य वाढो”; कंगना रनौतच्या शुभेच्छा

Kangana Ranaut meets Yogi Adityanath: “प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत, साम्राज्य वाढो”; कंगना रनौतच्या शुभेच्छा

googlenewsNext
ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ सरळमार्गी आणि खरे आहेतयोगीजी नेहमीच प्रेरणा देत असतातआगामी निवडणुकांसाठी हार्दिक शुभेच्छा

लखनऊ: आगामी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापताना दिसत आहे. भाजपने विजयाचा दावा केला असला, तरी विरोधकांनी भाजपला धूळ चारण्याचा निर्धार केला आहे. यातच आपला स्पष्टवक्तेपणा आणि वादग्रस्त विधाने, भूमिकांमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. यावेळी कंगना रनौतने योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रभू रामचंद्रांप्रमाणे एका योगी आदित्यनाथ यांचे राज्य असेच सुरू राहो, साम्राज्य वाढो, या शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. (bollywood actress kangana ranaut meets cm yogi adityanath and give best wishes for up election 2022)

आताच्या घडीला कंगना रनौत आपल्या चित्रपटांच्या चित्रिकरणात खूपच व्यस्त आहे. सध्या उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे कंगना रनौत तेजस चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. यादरम्यान कंगना रनौतने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. कंगना रनौतने सोशल मीडियावर फोटोज शेअर करत याविषयीची माहिती दिली. याशिवाय कंगनाने एक व्हिडिओही शेअर केला असून, यामध्ये योगी आदित्यनाथ आणि कंगना चर्चा करताना दिसत आहेत. 

प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत

या भेटीविषयी बोलताना कंगनाने सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट खूप शानदार झाली. ते सरळमार्गी आणि खरे आहेत. योगीजी नेहमीच प्रेरणा देत असतात. इतक्या कमी वयात देशाला लाडका नेता मिळणे म्हणजे भाग्यच आहे, या शब्दांत कंगनाने कौतुक केले आहे. कंगना पुढे म्हणते की, तेजस चित्रपटाच्या चित्रिकरणाला केलेल्या सहकार्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे आभारी आहोत. योगी आदित्यनाथ यांना आगामी निवडणुकांसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहे. आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांप्रमाणे तपस्वी राजा लाभला आणि आता आपल्याकडे योगीजी आहेत. प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत आणि योगीजींचे साम्राज्य वाढो हीच सदिच्छा. योगीजींनी श्रीरामजन्मभूमीसाठी वापरले जाणारे एक चांदीचे नाणे भेट म्हणून दिले आहे, असे कंगनाने नमूद केले. 

धाकड चित्रपटातही दिसणार

योगी आदित्यनाथ यांची भेट घेताना कंगना रनौतने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. यावेळी ती खूपच आनंदी आणि प्रसन्न दिसत होती. आताच्या घडीला चित्रिकरण सुरू असलेल्या तेजस चित्रपटात कंगना स्टंट करताना दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तेजस चित्रपटाविषयीची माहिती समोर येत आहे. याशिवाय कंगना रनौत धाकड चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. अलीकडेच कंगनाचा थलायवी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. 

Web Title: bollywood actress kangana ranaut meets cm yogi adityanath and give best wishes for up election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.