कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:00 PM2024-11-06T13:00:47+5:302024-11-06T13:01:25+5:30
कंगना रणौतने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट करताना लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे
आज अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाचे अपडेट समोर येत आहेत. थोड्याच वेळात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. कमला हॅरीस आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांपैकी कोण निवडणुकीत बाजी मारणार, याकडे जगाचं लक्ष आहे. अशातच अध्यक्षपदाची घोषणा होण्याआधीच कंगनाने राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल खास पोस्ट लिहिली आहे.
कंगनाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट
कंगनाने अवघ्या काही तासांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे की, "जर मी अमेरिकन असते तर मी या व्यक्तीला माझं मत दिलं असतं ज्याला गोळी लागली होती. गोळी लागल्यानंतरही त्या व्यक्तीने उठून स्वतःचं भाषण पूर्ण केलं होतं. टोटल किलर" अशी पोस्ट लिहून कंगनाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल पोस्ट लिहून त्यांना सपोर्ट केलाय.
ट्र्म्प यांना मतांची आघाडी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ५० पैकी आता केवळ १० राज्यांमध्ये मतमोजणी बाकी आहे. आतापर्यंत ४० राज्यांचे निकाल आले आहेत. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प २५ तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस १५ जागांवर विजयी झाले आहेत. ट्रम्प हे बहुमतापासून अवघ्या ४० जागा दूर आहेत. त्यांना ५३८ जागांपैकी २३० जागा मिळाल्या आहेत. तर कमला यांना २१० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता वर्तणव्यात येत आहे.