बॉलिवूडमधील अशी एकमेव अभिनेत्री जिच्या नावाने मुंबईत फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 06:03 PM2024-09-17T18:03:18+5:302024-09-17T18:06:08+5:30

बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री जिच्या नावाने मुंबईत फिल्म फेस्टिव्हलचं होणार आयोजन होणार आहे

Bollywood actress kareena kapoor khan film festival in Mumbai pvr inox details inside | बॉलिवूडमधील अशी एकमेव अभिनेत्री जिच्या नावाने मुंबईत फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन, जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडमधील अशी एकमेव अभिनेत्री जिच्या नावाने मुंबईत फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन, जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत अनेक अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. मधुबाला, शर्मिला टागोर, सुचित्रा सेन पासून सध्याच्या ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर अशा अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये स्वतःची छाप पाडलीय. शिवाय प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलंय. बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्रीच्या नावाने फिल्म फेस्टिव्हलची घोषणा झालीय. ही अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. 

करीनाच्या नावाने होणार मुंबईत फिल्म फेस्टिव्हल

करीना कपूर खान गेली २५ हून अधिक वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. आता करीनाला मोठा बहुमान मिळतोय. करीना बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे जिच्या नावाने मुंबईत फिल्म फेस्टिव्हल होणार आहे. PVR आणि INOX या सिनेमागृहांनी ही घोषणा केली असून करीनाच्या खास सिनेमांचा फिल्म फेस्टिव्हल मुंबईतील निवडक थिएटरमध्ये होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये करीनाचे गाजलेले सिनेमे जसं की, 'जब वी मेट', 'कभी खुशी कभी गम', 'चमेली' दाखवण्यात येणार आहेत.


करीनाचं वर्कफ्रंट

करीनाने सोशल मीडियावर ही घोषणा केलीय. स्वतःच्या सिनेमांचा फिल्म फेस्टिव्हल आयोजित होत असल्याने करीनाला खूप आनंद झालाय. बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री जिच्या नावाने हा फिल्म फेस्टिव्हल पहिल्यांदाच आयोजित केला जातोय. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर.. तिचा 'द बर्किंगहम मर्डर' सिनेमा नुकताच भेटीला आलाय. याशिवाय करीना दिवाळीत रिलीज होणाऱ्या 'सिंंघम अगेन' सिनेमात अजय देवगणसोबत झळकणार आहे.

Web Title: Bollywood actress kareena kapoor khan film festival in Mumbai pvr inox details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.