दिल तू जान तू! कतरिना कैफने लिहीली विकी कौशलसाठी रोमॅंटिक पोस्ट; कारणही आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 11:15 AM2024-12-10T11:15:41+5:302024-12-10T11:18:17+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांची जोडी इंडस्ट्रीतील चर्चेत असणाऱ्या कपल्सपैकी एक आहे.
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding Anniversary: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) ही जोडी इंडस्ट्रीतील चर्चेत असणाऱ्या कपल्सपैकी एक आहे. चाहत्यांमध्येही त्यांच्याविषयी चर्चा होत असते. दोघांनीही बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत दोघेही एकमेंकावरचं प्रेम व्यक्त करण्याची कुठलही संधी सोडत नाहीत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता. काल त्यांच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दोघांनी पुन्हा राजस्थानला जाऊन त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, कतरिनाने सोशल मीडियावर विकी कौशलसाठी खास रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे.
कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. "दिल तू जान तू..." अशा रोमॅंटिक अंदाजात तिने विकी कौशलला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता विकी कौशलनेही इन्स्टाग्रामवर त्याचे आणि कतरिनाचा फोटो रिशेअर केल्याचा पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर कतरिनाने विकीसोबतच सेल्फी काढत सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे. विकी कौशलने या फोटोंमध्ये ब्लॅक टी-शर्ट आणि डोळ्यांना गॉगल लावला आहे. तर कतरिना कैफने पिवळ्या रंगाच्या टॉप परिधान केला आहे. बॉलिवूडच्या या कपलचे क्यूट फोटो पाहून कलाकारांसह नेटकऱ्यांनीही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
कतरिना आणि विकीने राजस्थानच्या मोधपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्न केलं होतं. ९ डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधलीय. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सामील झाले होते.