'भूल भुलैय्या-३' पाहून माधुरी दीक्षितच्या मुलांची होती 'अशी' रिअॅक्शन; अभिनेत्री म्हणाली- "त्यांनी अमेरिकेत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:22 IST2024-11-20T13:18:39+5:302024-11-20T13:22:24+5:30
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षितची 'भूल भुलैय्या-३' (Bhool Bhuliya-3) चित्रपटामुळे सर्वत्र चर्चा होताना दिसते.

'भूल भुलैय्या-३' पाहून माधुरी दीक्षितच्या मुलांची होती 'अशी' रिअॅक्शन; अभिनेत्री म्हणाली- "त्यांनी अमेरिकेत..."
Madhuri Dixit:बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit)'भूल भुलैय्या-३' (Bhool Bhulaiyaa- 3) चित्रपटामुळे सर्वत्र चर्चा होताना दिसते. आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. माधुरीने चित्रपटात केलेलं काम पाहून तिच्या मुलांची काय रिअॅक्शन होती याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
अलिकडेच माधुरीने 'आजतक'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'भूल भुलैय्या-३' च्या यशानंतर चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल सांगितलं. शिवाय हा चित्रपट परदेशात पाहिल्यानंतर तिची मुले काय म्हणाली? याबद्दल एक मजेशीर किस्सा तिने शेअर केला. त्यादरम्यान माधुरी म्हणाली, "हो, माझ्या मुलांनी हा चित्रपट अमेरिकेतील एका थिएटरमध्ये त्यांच्या मित्रांसोबत पाहिला. त्यांना हा चित्रपट खूपच आवडला. 'भूल भुलैय्या-३' पाहिल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की, सिनेमा फारच छान आहे. त्याचबरोबर यात मंजुलिकाचं पात्र तू उत्तमरित्या साकारलं. तेव्हा ते मला त्या रूपात पाहून चकित झाले होते".
सध्या हॉरर-कॉमेडी असलेला चित्रपट ‘भूल भुलैया-३’ची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. १ नोव्हेंबरला हा चित्रपट थिए़टरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात कार्तिक आर्यनसह माधुरी दीक्षित, विद्या बालन शिवाय राजपाल यादव यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.