'एक दो तीन' च्या रिमेकसाठी माधुरी दीक्षितची 'या' अभिनेत्रीच्या नावाला पसंती; म्हणाली-"तिचा डान्स पाहून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 10:30 IST2025-03-18T10:27:34+5:302025-03-18T10:30:06+5:30

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.

bollywood actress madhuri dixit says about rasha thadani would be perfect for ek do teen song remake | 'एक दो तीन' च्या रिमेकसाठी माधुरी दीक्षितची 'या' अभिनेत्रीच्या नावाला पसंती; म्हणाली-"तिचा डान्स पाहून..."

'एक दो तीन' च्या रिमेकसाठी माधुरी दीक्षितची 'या' अभिनेत्रीच्या नावाला पसंती; म्हणाली-"तिचा डान्स पाहून..."

Madhuri Dixit:बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). ९० च्या दशकातील आघाडीची नायिकांमध्ये तिचं नाव अव्वल स्थानावर येतं. १९८४ मध्ये आलेल्या 'अबोध' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर अभिनेत्रीने 'खलनायक','हम आपके हैं कौन','दिल तो पागल हैं','साजन' अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. दमदार अभिनय, सौंदर्य आणि नृत्यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. परंतु 'तेजाब' चित्रपटातील 'एक दो तीन' गाण्यामुळे प्रेक्षकांना अक्षरश वेड लावलं. अशातच अलिकडेच  एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला या गाण्याचा रिमेक करण्यात आला तर, हे गाणं कोण उत्तमरित्या सादर करेल? असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत अभिनेत्रीने मत मांडलं आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमात माधुरीला विचारण्यात आलं की, जर तिच्या 'एक दो तीन' हिट गाण्याचा रिमेक बनवला गेला तर आजच्या काळातील अभिनेत्रींपैकी कोणती अभिनेत्री त्यावर चांगला डान्स करू शकेल? त्यावर उत्तर देताना माधुरीने क्षणाचाही विलंब न करता थेट अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानीच्या नावाला पसंती दर्शवली. त्यावेळी माधुरी म्हणाली, "राशाचा डान्स खूपच सुंदर आहे आणि 'ऊई अम्मा' गाण्यातील तिचा उत्साह आणि डान्स दोन्ही प्रचंड आवडलं." असा खुलासा तिने केला. 

दरम्यान, रवीना टंडनची लेक राशा थडानी तिचा आगामी चित्रपट 'आझादमुळे चांगलीच चर्चेत आली. या चित्रपटातील काम पाहून राशाचं खूप कौतुक होत आहे. विशेषत: राशाचे 'उई अम्मा' या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

Web Title: bollywood actress madhuri dixit says about rasha thadani would be perfect for ek do teen song remake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.