धकधक गर्ल माधुरी दीक्षित लढवणार लोकसभा निवडणूक?, अभिनेत्री म्हणाली - "मला राजकारणात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:28 PM2023-12-29T16:28:45+5:302023-12-29T16:29:21+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. माधुरी दीक्षित लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याचंही काही बोलले जात आहे.

Bollywood Actress Madhuri Dixit will contest the Lok Sabha elections? She said - "I want to be in politics..." | धकधक गर्ल माधुरी दीक्षित लढवणार लोकसभा निवडणूक?, अभिनेत्री म्हणाली - "मला राजकारणात..."

धकधक गर्ल माधुरी दीक्षित लढवणार लोकसभा निवडणूक?, अभिनेत्री म्हणाली - "मला राजकारणात..."

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. माधुरी दीक्षित लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याचंही काही बोलले जात आहे. या वृत्तांदरम्यान माधुरीने आता यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

माधुरी दीक्षित नुकतीच झी न्यूज मराठीच्या एका टॉक शोमध्ये दिसली. या कार्यक्रमात तिचा नवरा डॉ. नेनेदेखील सहभागी झाले होते. दरम्यान, ती खरंच राजकारणात प्रवेश करत आहे का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर माधुरी म्हणाली, नाही, अजिबात नाही. मला राजकारणात रस नाही. जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा माझ्याबद्दल अशा अफवा पसरवल्या जातात, पण मला राजकारणात रस नाही. प्रत्येक वेळी मला निवडणुकीला उभे केले जाते.

आम्ही निष्पक्ष आहोत - डॉ. नेने

माधुरीने सांगितले की, तिला या अफवांबद्दल माहित असते. मात्र त्यांच्या राजकारणात येण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. माधुरीनेही तिच्या चाहत्यांना अशा अफवा टाळण्याची विनंती केली आहे. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेने म्हणाले की, माधुरीला राजकारणात येण्यात रस नसला तरी जे राजकारणी चांगले काम करतात त्यांचे त्यांना नक्कीच कौतुक वाटते. ते म्हणाले, आमचा सर्वांना पाठिंबा आहे. आम्ही निष्पक्ष आहोत. कुणी चांगलं काम केलं तर त्याला पाठिंबा द्यायला हवा.

वर्कफ्रंट...
माधुरीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच झलक दिखला जा या डान्स रिएलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. हा शो ३ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार आहे. चित्रपटांबद्दल सांगायचे तर माधुरीचा शेवटचा चित्रपट नेटफ्लिक्सचा द फेम गेम आणि अॅमेझॉन प्राइमचा मजा मा आहे.
 

Web Title: Bollywood Actress Madhuri Dixit will contest the Lok Sabha elections? She said - "I want to be in politics..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.