शूटिंग सुरु होऊनही 'परदेस'च्या सेटवर शाहरुख २० दिवस गैरहजर! काय होतं कारण? महिमा चौधरीने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:42 IST2024-10-10T12:38:38+5:302024-10-10T12:42:50+5:30
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि महिमा चौधरी मुख्य भूमिकेत असलेला 'परदेस' चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला.

शूटिंग सुरु होऊनही 'परदेस'च्या सेटवर शाहरुख २० दिवस गैरहजर! काय होतं कारण? महिमा चौधरीने केला खुलासा
Mahima Chaudhary : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि महिमा चौधरी(Mahima Chaudhary) मुख्य भूमिकेत असलेला 'परदेस' चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून महिमा चौधरीने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. रोमॅन्टिक ड्रामाने परिपूर्ण असलेल्या चित्रपटाचं कथानक शिवाय गाणीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. 'दो दिल मिल रहें हैं' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत महिमाने या चित्रपटातील एक खास आठवण शेअर केली आहे.
'परदेस'च्या सेटवर २० दिवस उशीरा आला शाहरुख खान:
नुकतीच महिमा चौधरीने 'रेडिओ नशा' या चॅनलला एक मुलाखत दिली.या मुलाखती दरम्यान अभिनेत्री म्हणाली, 'परदेस'च्या सेटवर तब्बल २० दिवस क्रुने शाहरुखची वाट पाहिली, तिथे प्रत्येकजण शाहरुख आज येईल उद्या येईल असं म्हणत होता. पण, तो आलाच नाही. अखेर जेव्हा शाहरुख खान सेटवर आला तेव्हा सगळ्यांनी त्याच्या अवती भोवती गर्दी केली. तेथील प्रत्येकजण हा नवा होता त्यामुळे त्यांना शाहरुखला भेटायचं होतं. जेव्हा शाहरुख प्रत्येकासोबत संवाद साधायचा तेव्हा सगळेच त्याचं बोलणं ऐकत राहायचे. त्याच्याकडे माहितीचं भांडार होतं".
पुढे अभिनेत्रीने सांगितलं, "मी तेव्हा एकाजागी बसून शाहरुख कशा पद्धतीने सीन करतो त्याचे डायलॉग बोलतो शिवाय त्याचा डान्स या सगळ्या गोष्टींचं बारकाईने निरिक्षण करायचे".
सुभाष घई यांच्या 'परदेस' या सिनेमात शाहरुख खानसोबत महिमा चौधरीने स्क्रिन शेअर केली होती. परदेस मध्ये अपूर्व अग्निहोत्री, अमरिश पुरी, आलोक नाथ आणि हिमानी शिवपुरी यांसारख्या कलाकारांची फौज पाहायला मिळाली.