"इंटिमेट सीन्स केल्यामुळे लोक ट्रोल करायचे..." मल्लिका शेरावतने सांगितला 'मर्डर' मधील 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 11:27 AM2024-10-14T11:27:09+5:302024-10-14T11:31:20+5:30
अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन्सबाबत भाष्य केलं आहे.
Mallika Sherawat: अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) 'मर्डर', 'प्यार के साइड इफेक्ट्स' तसेच 'वेलकम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांची मनं जिंकली. मागील काही वर्षांपासून अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली होती. सध्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने इंडस्ट्रीत दमदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळतंय. पण, मल्लिकाला 'मर्डर' या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. 2004 साली आलेल्या 'मर्डर' सिनेमातून इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि मल्लिका शेरावत या हॉट जोडीने लक्ष वेधून घेतलं होतं. त्या चित्रपटात दिलेल्या इंटिमेट सीन्समुळे ही जोडी प्रचंड चर्चेत होती. नुकतंच मल्लिकाने तिच्या 'मर्डर' मधील दृश्यांबाबत भाष्य केलं आहे.
नुकतीच मल्लिका शेरावतने 'रणवीर अलहाबादिया'च्या पॉडकास्ट चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने 'मर्डर' सिनेमात तिने दिलेल्या इंटिमेट सीन्समुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता, असं तिने सांगितलं. या मुलाखतीदरम्यान अभिनेत्री म्हणाली," 'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन्समुळे काही लोकांनी मला ट्रोल केलं होतं. या गोष्टीमुळे मी खूप दुखावले गेले. पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मर्डर'मुळे मला खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य मिळालं. त्यानंतर माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगू लागले. माझे निर्णय मी स्वत: घेत होते".
महेश भट यांनी दिला होता सल्ला-
"लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केल्यानंतर मी रडत रडत महेश भट यांच्याकडे गेले आणि त्यांना सगळं सांगितलं. त्यावर महेश भट यांनी याकडे दूर्लक्ष करण्याचा सल्ला मला दिला होता". असा खुलासा मल्लिकाने मुलाखतीत केला.
२००४ मध्ये आलेल्या 'मर्डर' हा चित्रपटात थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. आज २० वर्षे उलटूनही या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासु यांनी केलं होतं. त्यावेळी हा सिनेमा चांगलाच गाजला. शिवाय 'मर्डर' चित्रपटामुळे मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांच्या करिअरला कलाटणी मिळाली.