तब्बल २४ वर्षानंतर मायदेशी परतली ममता कुलकर्णी! मुंबई एअरपोर्टवर येताच झाली भावुक; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:48 PM2024-12-04T12:48:42+5:302024-12-04T12:51:06+5:30

अमली पदार्थ प्रकरणानंतर २४ वर्षांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी भारतात परतली आहे.

bollywood actress mamta kulkarni return to india after 24 years shared emotional video on social media  | तब्बल २४ वर्षानंतर मायदेशी परतली ममता कुलकर्णी! मुंबई एअरपोर्टवर येताच झाली भावुक; व्हिडीओ व्हायरल

तब्बल २४ वर्षानंतर मायदेशी परतली ममता कुलकर्णी! मुंबई एअरपोर्टवर येताच झाली भावुक; व्हिडीओ व्हायरल

Mamta Kulkarni: ९० च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीची (Mamta Kulkarni) एक वेगळीच क्रेझ होती. तिरंगा या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ममताने चाहत्यांना आपल्या अभिनयासह सौंदर्यानेही भुरळ घातली होती. बॉलिवूडमधील करिअरप्रमाणे ममताचं वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत राहिलं. अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. २००२ साली ममताने ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्नागाठ बांधली. लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर ममता पतीबरोबर केनियाला स्थायिक झाली होती. त्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमधून गायब झाली. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हायरल होणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये जवळपास २४ वर्षानंतर ममता मायदेशी परतणार असल्याचं तिने म्हटलं आहे. 


नुकताच ममता कुलकर्णीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये अभिनेत्री म्हणते की, "नमस्कार! मी ममता कुलकर्णी. मी नुकतीच भारतात, मुंबईत आली आहे. मुंबई आमची मुंबई! जवळपास २४ वर्षानंतर मी मायदेशी परतले आहे. त्यामुळे माझ्या भूतकाळातील आठवणी ताज्या झाल्या आहेत. २००० साली मी भारत सोडून परदेशी स्थायिक झाले. आता मुंबईत आल्यानंतर मी खूपच भावुक झाले. माझ्या मनातील भावना मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. 

पुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "जेव्हा विमान लॅंडिग झालं त्यानंतर मी माझ्या आजुबाजूला पाहिलं. २४ वर्षानंतर देशाचा झालेला कायापालट पाहून मी भारावून गेले. माझ्या देशाची झालेली प्रगती पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मुंबई एअरपोर्ट बाहेरील दृश्ये पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या आहेत."

'तिरंगा' नंतर ममताने 'आशिक',  'आवारा',  'क्रांतिवीर', 'वक्त हमारा हैं', 'सबसे बडा खिलाडी' तसेच 'करण अर्जुन' यांसारखे हिट सिनेमे दिले. बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिल्याने ममता कुलकर्णीला त्याकाळी बॉलिवूडमधील रिजेक्शन क्वीन म्हटलं जायचं. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममता आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. 

Web Title: bollywood actress mamta kulkarni return to india after 24 years shared emotional video on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.