WHAT!! बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’ मंडळींमुळे संपलं या ‘मिस इंडिया’चं करिअर?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:00 AM2022-03-25T08:00:00+5:302022-03-25T08:00:02+5:30
Bollywood Actress : मेन स्ट्रिम चित्रपटांत रोल न मिळाल्याने तिने काही बी-ग्रेड चित्रपटात काम केलं आणि यानंतर अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेतली.
Bollywood Actress : गतकाळातील अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. मात्र आज यापैकी अनेकजणी प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेल्या आहेत. काही जणी तर ओळखताही येऊ नये इतक्या बदलल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. होय, 80 व 90 च्या दशकातील सुपरमॉडेल आणि अभिनेत्री सोनू वालिया (Sonu Walia) ही एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. 19 फेबु्रवारी 1964 रोजी दिल्लीच्या एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या सोनूने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली.
सोनूने 1985 मध्ये ‘मिस इंडिया’ किताब जिंकला आणि बॉलिवूडची कवाडं तिच्यासाठी खुली झालीत. 1988 मध्ये ‘आकर्षण’ या चित्रपटाद्वारे सोनूने बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात एका तलावाकाठी सोनूवर सेक्स सीन चित्रीत केला गेला आणि सगळीकडे खळबळ माजली. त्या काळात इतका हॉट सीन देण्यास नट्या धजावत नसत. पण सोनूने इतकं बोल्ड दृश्य देण्याची हिंमत दाखवली आणि एका रात्रीत ती चर्चेत आली. यानंतर राकेश रोशन यांनी सोनूला ‘खून भरी मांग’ या चित्रपटासाठी साईन केलं. हा चित्रपट सोनूच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला. यातील भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही तिने जिंकला.
यापश्चात महादेव, क्लर्क, महासंग्राम, हातिमताई, तेजा,नंबरी आदमी, प्रतिकार, दिल आश्ना है अशा डझनावर चित्रपटात सोनू दिसली. पण ‘खून भरी मांग’ सारखी जादू तिला दाखवता आली नाही. 2008 मध्ये आलेला ‘जय मां शेरावाली’ हा तिचा शेवटचा चित्रपट.
सोनू बॉलिवूडमधून अचानक का गायब झाली?
मेन स्ट्रिम चित्रपटांत रोल न मिळाल्याने सोनूने काही बी-ग्रेड चित्रपटात काम केलं आणि यानंतर अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. सोनू बॉलिवूडमधून अचानक का गायब झाली, यामागे खूप रोचक स्टोरी आहे. बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’मुळे सोनूने बॉलिवूडला रामराम ठोकला, हे तुम्हाला सांगूनही खरं वाटणार नाही. पण हे खरं आहे. खुद्द सोनूनेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’मुळे मला काम मिळणं बंद झालं आणि मी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे सोनूने सांगितलं होतं. तिन्ही ‘खान’मुळे मला काम मिळणं बंद झालं, याचा अर्थ काय? तर सोनूची उंची. होय, बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’पेक्षा सोनूची उंची बरीच होती. सोनूच्या मते, त्या काळात उंच मुलींना फार चित्रपट मिळत नसत.
बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर तिने हॉटेल मालक सूर्य प्रकाश याच्याशी संसार थाटला. काही वर्षात सूर्य प्रकाश यांचं निधन झालं. यानंतर सोनूने अमेरिकेत राहणारे निर्माते प्रताप सिंहसोबत लग्न केलं. दोघांचीही एक मुलगी आहे. सध्या सोनू मुंबईत राहते.