लग्नाची दोन वर्ष! मौनी रॉयने शेअर केले पतीसोबतचे रोमँटिक फोटो, म्हणाली, "७३० दिवसांच्या..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 01:50 PM2024-01-27T13:50:57+5:302024-01-27T13:53:35+5:30
अभिनेत्री मौनी रॉयने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Mouni Roy Wedding Anniversary :बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. हे कपल आज २७ जानेवारीला त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी मौनी रॉयने पती सूरजसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. मौनीने इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. नवरा सूरजसोबतचे तसेच लग्नातील काही फोटो शेअर करत मौनीने तिच्या आठवणींना उजाळा दिलाय. मौनी रॉयने या दिवशी तिचा प्रियकर सूरज नांबियारसोबत शाही पद्धतीने लग्न केले होते.
२०२२ मध्ये, अभिनेत्रीने प्रथम गोव्यात दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार लग्न केले, कारण सुरज दक्षिण भारतीय कुटुंबातील आहे. नुकतीच या जोडप्याच्या सुखी संसाराला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. ७३० दिवसांच्या आठवणी, ६३,०७२,००० सेकंद माझे बोलत राहिले तु माझं बोलणं ऐकत गेलास, असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलंय. या फोटोंमध्ये सुरज नांबियासोबतचे अप्रतिम फोटो तिने शेअर केलेत. या फोटोंमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनूसार, २०१९ मध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. साधारणत: ३ वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत होते. ३ वर्षे डेटिंग केल्यानंतर अखेरीस २७ जानेवारी २०२२ रोजी दोघांनी दक्षिण गोव्यात मल्याळी-बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केले. मेंहदी सोहळा ते लग्नातील विधिवत पूजेचे फोटो अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केलेत. मौनी रॉयने तिच्या लग्नात दक्षिण भारतीय वेडिंग ड्रेसमध्ये साधा मेकअप केला होता. ज्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत होती. त्याचवेळी सूरज गोल्डन आणि क्रीम कलरच्या कुर्ता-धोतीमध्ये दिसला. आज मनोरंजन विश्वात ही जोडी चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.