टेन्शन वाढलं! नोरा फतेही कोरोना पॉझिटीव्ह, सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 02:31 PM2021-12-30T14:31:05+5:302021-12-30T14:33:45+5:30
Nora Fatehi Tested Positive for Covid : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर...! शिल्पा शिरोडकर ही पहिली भारतीय सेलिब्रिटी होती, जिला पहिल्यांदा कोरोना लस मिळाली होती.
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळतोय. काल अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, अनिल कपूरची लेक रिया कपूर व तिचा पती करण बुलानी अशा चौघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. आता बॉलिवूडची ‘डान्सिंग क्वीन’ नोरा फतेही (Nora Fatehi ) हिलाही कोरोनाची लागण झाली आहे.
नोराच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह येताच, नोरा क्वारंटाइन झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. नोराच्या टीमने सांगितले की, 28 डिसेंबरला नोराच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला आणि तो पॉझिटीव्ह आला. काल नोरा घराबाहेर स्पॉट झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. पण ते जुने फोटो आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यापासून नोरा घरात क्वारंटाइन आहे, असंही तिच्या टीमच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंआहे.
शिल्पा शिरोडकरही (Shilpa Shirodkar) कोरोना पॉझिटीव्ह
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. शिल्पा कोरोना लस घेणारी भारतातील पहिली अभिनेत्री होती. तिने जानेवारीत कोरोना लस घेतली होती. शिल्पाने हम, खुदा गवाह, आंखे अशा चित्रपटात काम केलं. सध्या ती कुटुंबासोबत दुबईत राहते.
बॉलिवूडमध्येही कोरोना संक्रमण वाढताना दिसतेय. काही दिवसांआधी करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, मेहर कपूर या चौघी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या होत्या. यानंतर काल अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. अर्जुनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तो पॉझिटीव्ह आढळला होता. अनिल कपूरची लेक रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी या दोघांनीही कोरोनाची लागण झाली आहे.करिना व अमृताची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती, तेव्हा रिया कपूरच्या नावाचीही चर्चा झाली होती. रिया कपूरच्या घरी एक पार्टी झाली होती आणि या पार्टीला करिना व अमृता हजर होत्या. करिना व अमृता पॉझिटीव्ह आल्यानंतर रियाने टेस्ट केली होती. मात्र तेव्हा ती निगेटीव्ह आली होती. पण यावेळी तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.