कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 10:08 IST2025-02-25T10:06:32+5:302025-02-25T10:08:46+5:30

महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीदिवशी समारोप होणार आहे.

bollywood actress preity zinta visit mahakumbh mela 2025 in prayagraj shared glimpse photo viral  | कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल  

कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल  

Preity Zinta : उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. सर्वसामान्यांपासून ते राजकीय मंडळी तसेच सेलिब्रिटींनी देखील कुंभमेळ्यामध्ये हजेरी लावली. या महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीदिवशी समारोप होणार आहे.अगदी कालच्या दिवशीच अभिनेता अक्षय कुमार, कतरिना कैफ यांनी महाकुंभमेळ्यात जाऊन त्रिवेणी संगमावर श्रद्धेने स्नान केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta)देखील महाकुंभमेळ्यात पोहोचली आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना माहिती दिली आहे.


 अभिनेत्री प्रीती झिंटाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. कपाळावर चंदन तसेच गळ्यात फुलांची माळ घातलेला फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, 'सर्व रस्ते महाकुंभच्या दिशेने जातात. सत्यम शिवम सुंदरम्'. शिवाय तिने हॅशटॅगमध्ये महाकुंभ आणि प्रयागराज लिहिले आहे. त्यामुळे प्रीती झिंटा प्रयागराजमध्ये दाखल झाली असल्याचे अंदाज अनेकजण लावत आहेत. 

प्रीती झिंटाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.  "उत्तर प्रदेशमध्ये तुमचं स्वागत...", अशी प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. तर आणखी एक यूजर म्हणतो, "याच कारणामुळे तुम्ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहात."

Web Title: bollywood actress preity zinta visit mahakumbh mela 2025 in prayagraj shared glimpse photo viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.