वडिलांच्या निधनानंतर ४ दिवसांतच कामावर परतली होती प्रियंका चोप्रा; म्हणाली-"दु:ख न कवटाळता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:24 IST2024-12-12T13:22:26+5:302024-12-12T13:24:00+5:30
बॉलिवूडसह हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) आपल्या अभिनयाने चाहत्यांची वाहवा मिळवली.

वडिलांच्या निधनानंतर ४ दिवसांतच कामावर परतली होती प्रियंका चोप्रा; म्हणाली-"दु:ख न कवटाळता..."
Priyanka Chopra:बॉलिवूडसह हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) आपल्या अभिनयाने चाहत्यांची वाहवा मिळवली. प्रियंकाने आतापर्यंत बॉलिवूड इंडस्ट्रीला बरेच सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. दरम्यान,सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.
नुकतीच प्रियंका चोप्राने 'पिंकविला' ला मुलाखत दिली. त्यावेळी प्रियंका तिच्या 'मेरी कोम' चित्रपटाचं शूटिंग करत होती. त्यादरम्यान शूट चालू असताना तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर अवघ्या ४ दिवसानंतरच ती कामावर परतली होती. यावर तिने खुलेपणाने भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, " माझ्या वडिलांच्या निधनानंतर ४ दिवसांतच मी 'मेरी कोम' च्या सेटवर परतले. कारण माझ्या वडिलांची सुद्धा तिच इच्छा होती. त्यावेळी चित्रपटाचं शूट करताना माझं दु: ख मी न कवटाळता ते बॉक्सिंग सीन केले. त्यानंतर मी 'गुंडे' सिनेमाचं शूटिंग सुरू केलं. "
पुढे अभिनेत्री म्हणाली," दिग्दर्शक संजय लीला भंन्साळी माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर सांत्वनासाठी घरी आले होते. तेव्हा भेट घेतली आणि मला लगेचच कामावर येण्याची काहीच गरज नाही, असं ते म्हणाले होते. पण, मी तसं न करता कामावर रुजू झाले. कदाचित माझं घरी राहणं माझ्या वडिलांनाही आवडलं नसतं." असा खुसाला अभिनेत्रीने केला.
अभिनेत्री प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत असलेला 'मेरी कोम' हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंग प्रकारात कास्य पदक मिळवणाऱ्या मेरी कोमच्या जीवनावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात प्रियंकाने मेरी कोमची उत्कृष्टरित्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर आपलं नाव कोरलं.