"ते दिवस आठवले की..."; प्रियंका चोप्राची आई मधु यांना आजही होतो 'त्या' निर्णयाचा पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:37 IST2024-11-30T13:33:33+5:302024-11-30T13:37:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरात आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

bollywood actress priyanka chopra mother madhu chopra revealed in interview about regret to send her into boarding school  | "ते दिवस आठवले की..."; प्रियंका चोप्राची आई मधु यांना आजही होतो 'त्या' निर्णयाचा पश्चाताप

"ते दिवस आठवले की..."; प्रियंका चोप्राची आई मधु यांना आजही होतो 'त्या' निर्णयाचा पश्चाताप

Priyanka Chopra:बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरात आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. बरेलीसारख्या छोट्याशा शहरातून आलेली प्रियंका आज इंटरनॅशनल स्टार बनली आहे. दरम्यान, प्रियांकाचा तिच्या घरच्यांना कायमच अभिमान वाटतो. परंतु अभिनेत्रीची आई मधू चोप्रा यांना लेक प्रियंकाबद्दल घेतलेल्या एका निर्णयाचा आजही पश्चाताप होतो. याचा खुलासा मधु यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 

'समथिंग बिअर टॉक'शो मध्ये रॉड्रिगो कॅनेलसबरोबर मधु चोप्रा यांनी लेक प्रियांकाच्या बालपणीचा एक किस्सा शेअर केला. त्यादरम्यान मधु चोप्रा म्हणाल्या, "माहित नाही मी चांगली आई बनू शकले की नाही. पण, मला आजही त्या गोष्टीची खंत वाटते. मला ती गोष्ट आठवली की,  माझ्या डोळ्यात अश्रू तरळतात. ते दिवस माझ्यासाठी खूपच कठीण होते. परंतु मी प्रत्येक शनिवारी ट्रेनने प्रवास करत प्रियांकाला भेटायला जायची. त्यावेळी बोर्डिंग स्कूलमध्ये जमवून घेणं तिला अवघड जायचं. त्यामुळे दर शनिवारी ती माझी वाट पाहत असायची की मी कधी तिला जाऊन भेटते."

पुढे मधु चोप्रा म्हणाल्या, "प्रियंकाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये जात असल्यामुळे एकदा तिच्या शिक्षिकांना पटत नव्हतं. तेव्हा प्रियंका फक्त सात वर्षांची होती, त्या वयात मी तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं. त्या निर्णयाचा मला आजही पश्चाताप होतो. पण, खरं सांगायचं झालं तर या निर्णयामुळे प्रियंकामध्ये खूपच सकारात्मक बदल झाला. त्यामुळेच ती आज इथपर्यंत आली आहे." स्वत: च्या पायांवर उभी आहे.  असं त्यांनी सांगितलं. 

Web Title: bollywood actress priyanka chopra mother madhu chopra revealed in interview about regret to send her into boarding school 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.