'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सेहगलने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; नावही ठेवलंय खूपच खास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:59 IST2024-12-17T15:54:48+5:302024-12-17T15:59:07+5:30

अभिनेत्री सोनाली सेहगल (Sonnali Seygall) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

bollywood actress pyaar ka panchnama fame sonnali seygall share her baby girl frist pic on social media  | 'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सेहगलने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; नावही ठेवलंय खूपच खास 

'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सेहगलने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; नावही ठेवलंय खूपच खास 

Sonnali Seygall: अभिनेत्री सोनाली सेहगल (Sonnali Seygall) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.'प्यार का पंचनामा' या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. अलिकडेच अभिनेत्री सोनाली सेहगलच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. वर्षभरापूर्वी सोनालीने बॉयफ्रेंड आशीष सजनानीशी लग्न केलं. आता तिने गूड न्यूज दिली आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्री सोनाली आणि तिचा पती आशिष दोघेही आनंदात आहेत. लग्नानंतर दीड वर्षांनंतर त्यांना कन्यारत्न लाभ झाला आहे. इन्स्टाग्रामवर लाडक्या लेकीच्या पाऊलांचा फोटो पोस्ट करून याबद्दल त्यांनी चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान, सोनालीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या लेकीचा फोटो पोस्ट केला आहे. त्याद्वारे अभिनेत्रीने तिच्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. 
सोनाली आणि आशिषने त्यांच्या मुलीचं नाव 'शुकर' असं आहे. जन्माच्या ४ दिवसानंतर त्यांनी नामकरण केलं होतं. इन्स्टाग्रामवर स्टोरीद्वारे सोनालीने लेकीचा क्यूट फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, या फोटोमध्ये अभिनेत्रीने तिच्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. 
 
सोनालीने 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्वीटी' या  सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने ७ जून २०२३ रोजी  बिझनेसमन आशिष सजनानीसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यापूर्वी कपल पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता लग्नानंतर ते आईबाबा होणार आहेत. 

Web Title: bollywood actress pyaar ka panchnama fame sonnali seygall share her baby girl frist pic on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.