३५व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीला कन्यारत्न, ४ दिवसांतच केलं लेकीचं बारसं, नावही ठेवलंय खूप खास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:41 PM2024-12-02T12:41:00+5:302024-12-02T12:43:53+5:30
अभिनेत्री सोनाली सेहगलने जन्माच्या ४ दिवसानंतरच जाहीर केलं मुलीचं नाव; अर्थही आहे खूप खास
Sonnali Seygall: 'प्यार का पंचनामा फेम' अभिनेत्री सोनाली सेहगलच्या (Sonnali Seygall) घरी नुकतंच चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. २७ नोव्हेंबर २०२४ च्या दिवशी तिने मुलीला जन्म दिला. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. जन्माच्या ४ दिवसांतच तिने मुलीचं बारसं केलं आहे.
सोनालीने २०२३ मध्ये व्यवसायिक आशिष सजनानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आणि दीडवर्षानंतर त्यांच्या घरी पाळणा हळला. सोनाली आणि आशिष आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीने लेकीच्या पाऊलांचा सुंदर फोटो शेअर करून तिचं नामकरण केल्याचं पाहायला मिळतंय. सोनाली आणि आशिष सजनानी यांनी आपल्या लाडक्या लेकीची पावलं हातात घेऊन हार्ट शेपची पोजमध्ये फोटो काढलाय. या फोटोसोबत त्यांनी मुलीचं नाव रिव्हिल केलं आहे. सोनाली आणि आशिषने त्यांच्या मुलीचं नाव 'शुकर' असं ठेवलं आहे.
सोशल मीडियावर सोनाली सेहगने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहलंय, "आम्ही आमच्या लाडकी लेकाची ओळख तुमच्यासोबत करून देत आहोत. तिचं नाव आम्ही 'शुकर ए सजनानी' असं ठेवलं आहे. याचा अर्थ असा की आयुष्यात आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण सहृदयाने आभार मानतो असतो. तिचा जन्म आमच्यासाठी जणू चमत्कार आहे. शिवाय आमचं आयुष्य तिने प्रेम, आनंदाने भरलं आहे. आशा आहे की तिला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळो. तिच्या जन्मामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. हा आनंद आम्ही शब्दातही व्यक्त करू शकत नाही."
सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने 'प्यार का पंचनामा', 'जय मम्मी दी', 'प्यार का पंचनामा','सोनू के टिटू की स्विटी', 'सेटर्स', 'हायजॅक','नुरानी चेहरा', 'जाने कहां से आई है' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.