अरे बापरे! वर्कआऊट करताना रकुल प्रीत सिंहला झाली दुखापत; ८० किलोंचं वजन उचललं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:35 IST2024-10-16T17:34:58+5:302024-10-16T17:35:29+5:30
रकुल प्रीत सिंहला वर्कआऊट करताना गंभीर दुखापत झालंय. काय घडलंय नेमकं जाणून घ्या (rakul preet singh)

अरे बापरे! वर्कआऊट करताना रकुल प्रीत सिंहला झाली दुखापत; ८० किलोंचं वजन उचललं अन्...
बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या फिटनेससाठी कसून मेहनत करताना दिसतात. हे कलाकार कधी जिममध्ये, कधी घरच्या घरीच, कधी योगा सेंटरमध्ये अनेकदा स्पॉट होताना दिसतात. रुपेरी पडद्यावर सुंदर दिसण्यासोबतच फिट असण्यावर या कलाकारांचा कल असतो. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सुद्धा याला अपवाद नाही. परंतु रकुल प्रीत सिंहसोबत वर्कआऊट करताना एक विचित्र घटना घडल्याने तिला दुखापत झालीय.
वर्कआऊट करताना रकुलला झाली दुखापत
मीडिया रिपोर्टनुसार रकुल गेल्या काही दिवसांपासून बेडरेस्टवर आहे. यामागचं कारण म्हणजे ५ ऑक्टोबरला रकुल प्रीत सिंहला वर्कआऊट करताना इजा झाली. रकुलने बेल्ट न वापरता ८० किलोचं वजन उचलून डेडलिफ्टचा व्यायाम केला. त्यामुळे अभिनेत्रीची पाठ आखडली गेली. वेदना होऊनही रकुल वर्कआऊट करत राहिली. त्यामुळे तिची इजा आणखी वाढली. सध्या डॉक्टरांनी अभिनेत्रीला आराम करायला सांगितला आहे.
रकुल प्रीत सिंहचं वर्कफ्रंट
सूत्रांच्या माहितीनुसार रकुल गेल्या काही दिवसांपासून वारंवार दुखापतींना बळी पडत आहे. वाढदिवशी सुद्धा रकुलची तब्येत बिघडली होती. अशातच वर्कआऊट करताना दुखापत झाल्याने रकुलची रकुलची L4, L5 आणि S1 या नसांना दुखापत झालीय. याशिवाय काही दिवसांपूर्वी बीपी ड्रॉप झाल्याने रकुलला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. रकुल सध्या तिच्या आगामी 'दे दे प्यार दे २' सिनेमाचं शूटींग करतेय.