"कम्फर्ट झोनमुळे तुम्ही कधीच...", रकुल प्रीत सिंगच्या पोस्टने वेधलं लक्ष; अभिनेत्री असं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:11 IST2025-02-13T12:09:10+5:302025-02-13T12:11:36+5:30
'यारियॉं' या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) लोकप्रिय झाली.

"कम्फर्ट झोनमुळे तुम्ही कधीच...", रकुल प्रीत सिंगच्या पोस्टने वेधलं लक्ष; अभिनेत्री असं काय म्हणाली?
Rakul Preet Singh: 'यारियॉं' या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) लोकप्रिय झाली. पहिल्याच चित्रपटातून तिला प्रचंड स्टारडम मिळाला. त्यानंतर अभिनेत्री बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये झळकली. दरम्यान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. सोशल मीडियावर हटके फोटो पोस्ट करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. सध्या रकुल प्रीत सिंग तिचा आगामी सिनेमा 'मेरे हसबंड की बिवी'मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटात रकुलसह अभिनेता अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अशातच नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे अनेकांचं लक्ष तिने आपल्याकडे वेधलं आहे.
रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर नुकतीच एक मोटिवेशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपल्या भावनांना मोकळीक दिली आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये रकुलने लिहिलंय की, "प्रत्येकाला आपला कफ्मर्ट झोन हा कायमच चांगला वाटतो, पण कफ्मर्ट झोन कधीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही." पुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "तुमचा कम्फर्ट झोन हा तुमचा शत्रू आहे. त्यामुळे तुमची कधीच प्रगती होऊ शकत नाही." अशा आशयाची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केल्याची पाहायला मिळते.
दरम्यान, सिनेरसिक 'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.'मेरी हसबंड की बिवी'मध्ये कॉमेडी आणि धमाल पाहायला मिळते आहे. मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हे. जॅकी भगनानी आणि वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केलीय. २१ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे.